Hera Pheri 3: बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या 'हेरा फेरी'च्या तिसऱ्या भागासाठी एक मोठी धक्का देणारी बातमी समोर आली आहे. या चित्रपटात 'बाबूराव गणपतराव आपटे' या अजरामर भूमिकेसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी 'हेरा फेरी 3' मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्वतः Times of India ला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे.
चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत अनेक अडचणी आल्या आहेत. सुरुवातीला अक्षय कुमारने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, आणि त्यांच्या जागी कार्तिक आर्यन यांची चर्चा झाली होती. मात्र, नंतर अक्षय कुमार यांने निर्माता फिरोज नाडियादवाला यांच्याशी मतभेद मिटवून पुन्हा चित्रपटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही, कायदेशीर अडचणींमुळे चित्रपटाच्या निर्मितीत विलंब झाला. प्रशंसकांना दिलासा मिळाला होता की, प्रियदर्शन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. मात्र, आता परेश रावल यांच्या बाहेर पडण्यामुळे चित्रपटाच्या निर्मीतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. माहिती नुसार,चित्रपटाच्या निर्मात्यांशी क्रिएटिव्ह मतभेदांमुळे परेश रावल यांनी चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
परेश रावल यांनी 'हेरा फेरी' मालिकेत 'बाबूभैय्या' या पात्राला जीवंत केले होते आणि त्यांच्या अभिनयामुळे हे पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिले. त्यांच्या अनुपस्थितीत, 'हेरा फेरी 3' मध्ये बाबूरावचे पात्र कोण साकारणार?, किंवा हे पात्रच वगळले जाणार का?, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे.
१९ वर्षांनंतर, प्रियदर्शन त्याच्या हिट फ्रँचायझीचा म्हणजेच 'हेरा फेरी ३; चा सिक्वेल घेऊन येत आहे. 'हेरा फेरी' २००० मध्ये आली आणि नंतर २००६ मध्ये 'फिर हेरा फेरी' आली. शेवटच्या दोन चित्रपटांच्या यशानंतर, काही महिन्यांपूर्वी त्याचा तिसरा भाग जाहीर करण्यात आला. जेव्हा प्रियदर्शनने अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे हिट त्रिकूट हेरा फेरीसाठी परत येणार असल्याची घोषणा केली तेव्हा चाहत्यांना खूप आनंद झाला पण आता कदाचित तसे आता होणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.