Panchayat 4 VIDEO: "देख रहा है बिनोद...";'पंचायत'चा चौथा सीझन आला, धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

Panchayat 4 Trailer : 'पंचायत सीझन 4'चा नुकताच ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरमध्ये नेमकं काय, पाहूया.
Panchayat 4 Trailer
Panchayat 4 VIDEOSAAM TV
Published On

लोकप्रिय सीरिज 'पंचायत सीझन 4' (Panchayat 4 Trailer) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पंचायत सीझन 4' चा मजेदार ट्रेलर प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'पंचायत सीझन 4' ही बहुप्रतिक्षित वेब सीरिज आहे. 'पंचायत सीझन 4' सीरिजचे लेखन चंदन कुमार यांनी केले आहे आणि दिग्दर्शनाची जबाबदारी दीपक कुमार मिश्रा आणि अक्षत विजयवर्गीय यांनी सांभाळली आहे.

'पंचायत सीझन 4' सीरिज 24 जून 2025 पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतासह जगभरातील 240 हून अधिक देशांमध्ये केवळ प्राइम व्हिडिओवर 'पंचायत सीझन 4' पाहता येणार आहे. 'फुलेरा' गावात राजकीय रणसंग्राम रंगणार आहे. 'पंचायत सीझन 4' काल्पनिक 'फुलेरा' गावावर आधारित असून , यावेळी गावात सत्तासंघर्षाचे वातावरण पाहायला मिळणार आहे.

'पंचायत सीझन 4' मध्ये मंजू देवी आणि क्रांती देवी आमनेसामने उभ्या असून गावात रॅली, भाषणं, घोषणा आणि एकमेकांवर टीका-टिप्पणीचा धडाका लागलेला ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. 'पंचायत सीझन 4'च्या ट्रेलरमध्ये गावाचे वातावरण अक्षरशः मेळ्यासारखे भासते. ढोल, ताशा आणि देसी प्रचार गाण्यांसह ट्रेलरमध्ये धुमाकूळ पाहायला मिळत आहे. या सीझनमध्ये नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

'पंचायत सीझन 4' स्टारकास्ट

'पंचायत सीझन 4'मध्ये तगडे कलाकार पाहायला मिळाणार आहेत. यात जितेन्द्र कुमार , नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, दुर्गेश कुमार, सुनीता राजवार आणि पंकज झा हे कलाकार आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घालणार आहेत.

Panchayat 4 Trailer
Genelia Deshmukh VIDEO : सुख कळले...; जिनिलीयानं केली वडाची पूजा, रितेश म्हणाला बायको...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com