Genelia Deshmukh VIDEO : सुख कळले...; जिनिलीयानं केली वडाची पूजा, रितेश म्हणाला बायको...

Genelia-Vat Purnima Celebration : जिनिलीयाने काल वटपौर्णिमेचे व्रत केले. याचा खास व्हिडीओ जिनिलीयाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यावर रितेशने खास कमेंट केली आहे.
Genelia-Vat Purnima Celebration
Genelia Deshmukh VIDEOSAAM TV
Published On

महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलीया (Genelia ) हे बॉलिवूडचे पावर कपल आहे. हे जोडपे कायम चर्चेत असते. यांचा मोठा चाहता वर्ग आहे. नुकतेच जिनिलीया आपल्या लाडक्या नवऱ्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केले आहे. याचा खास व्हिडीओ जिनिलीयाने इन्स्टाग्रामच्या स्टोरीला पोस्ट केला आहे. जिनिलीयाच्या या साध्याभोळ्या स्वभावाने सर्वांचे मन जिंकले आहे.

काल (10) जानेवारीला वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. जिनिलीयाने देखील रितेशसाठी घरीच वडाची पूजा केली. याचा व्हिडीओ शेअर करून जिनिलीयाने एक खास कॅप्शन त्याला दिले आहे. तिने लिहिलं की, "प्रिय नवरा, आय लव्ह यू" त्यानंतर रितेशने जिनिलीयाचा वडाची पूजा करतानाचा व्हिडीओ शेअर करून त्याला हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "प्रिय बायको तू माझ्या आयुष्यात आहेस याचा मला खरोखरच आनंद आहे. तू माझा आधार आहेस, माझी शक्ती आहेस, माझे जीवन तुझ्याभोवती आहे. तु माझ्या पंखांचे बळ आहेस."

जिनिलीयाचा वटपौर्णिमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. नेटकरी जिनिलीयाचा कौतुक करतना दिसत आहेत. तर रितेश-जिनिलीयाच्या जोडीवर प्रेमाचा वर्षाव होत आहे. रितेश-जिनिलीया यांनी 2012 साली लग्नगाठ बांधली. आता त्यांना दोन मुलं देखील आहे.

riteish deshmukh
riteish deshmukhinstagram

रितेश-जिनिलीया वर्कफ्रंट

नुकताच रितेश देशमुख 'हाऊसफुल 5' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तसेच नवीन वर्षात त्याचा 'राजा शिवाजी' चित्रपट येणार आहे. तर जिनिलीया 'सितारे जमीन पर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे.

Genelia-Vat Purnima Celebration
Katrina Kaif : कतरिना कैफ बनली मालदीवची 'ग्लोबल ब्रँड अ‍ॅम्बेसेडर'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com