Shweta Tiwari A Proud Mother: ती स्टार कीड नाही तरीही.. पलकचा अभिनय पाहून आई श्वेता तिवारी भारावली..

Shweta Tiwari's daughter Palak Tiwari: पलकने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून पदार्पण केले आहे.
Shweta Tiwari Appreciated her daughter Palak Tiwari's work
Shweta Tiwari Appreciated her daughter Palak Tiwari's work Instagram @palaktiwarii

Shweta Tiwari Appreciated Daughter Palak Tiwari's work: टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीनेही आईप्रमाणेच फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आहे. पलकने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून पदार्पण केले आहे. हा चित्रपट २१ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. त्याचबरोबर श्वेताने मुलीच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा किसी का भाई किसी की जान चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये अनेक नवीन कलाकारांनी पदार्पण केले आहे. शेहनाज गिल, राघव, सिद्धार्थ निकमसह पलक तिवारीच्या देखील यात समावेश आहे. तर पलक तिवारीची आई म्हणजे श्वेता तिवारीने लेकीच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.

Shweta Tiwari Appreciated her daughter Palak Tiwari's work
Shiv Thakare Rejected Movie: काय सांगता..! शिव ठाकरेने नाकारले २ बडे चित्रपट; समोर आलं मोठं कारण

श्वेता तिवारीने ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पलक तिवारीच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. श्वेता म्हणाली, “पडद्यावर इतक्या दिग्गज कलाकारांसोबतचे पलकला काम करताना पाहून तिच्या खूप अभिमान वाटला. मी अशी इच्छा व्यक्त करते की तुम्ही सर्वांनी माझ्या मुलीला तिच्या भविष्यासाठी आशीर्वाद द्यावेत.

मी काल चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांजणही हा चित्रपट पाहाल. मला तिचा नेहमीच अभिमान वाटतो मग ती चित्रपटात असो किंवा ती इतर काहीही करत असो. ती एक गुणी मुलगी आहे म्हणून मला नेहमीच तिचा अभिमान वाटतो... जेव्हा जेव्हा मी तिचे बोलणे किंवा वागणे किंवा घरातील वावराने पाहतो तेव्हा मला तिचा खूप अभिमान वाटतो."

तर पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पलक तिवारी म्हणाली, 'मी 'स्टार किड' नाही आणि सामान्य माणूसही नाही. मला एकच फायदा झाला आहे की लोक मला सहज ओळखतात (आई एक अभिनेत्री असल्याने). याचा अर्थ असा नाही की मला खूप काम मिळू लागले आहे. तरीही मी स्वतःला भाग्यवान समजते. 'हे माझ्यासाठी नवीन आहे... लोक मला पूर्वीही ओळखायचे, पण माझ्या आईमुळे.

2020 मध्ये पलक तिवारी अरबाज खानच्या 'रोजी: द सेफ्रॉन चॅप्टर' या चित्रपटातून डेब्यू करणार असल्याची बातमी समोर आली होती, पण त्या चित्रपटावर काम सुरू होऊ शकले नाही. पलक म्हणाली, 'जो होता है अच्छे के लिए होता है' 'रोजी'मध्ये काम केले नाही, पण त्यानंतर मला खूप मोठ्या कलाकारासोबत (सलमान) काम करण्याची संधी मिळाली.

यापेक्षा चांगली सुरुवात असू शकते, असे मला वाटत नाही. या चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त तेलुगू कलाकार व्यंकटेश, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल आणि विनाली भटनागर देखील आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com