Akshay Kumar: बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारला चित्रपटसृष्टी बहुआयामी अभिनेता म्हणून ओळखतात. त्याने बॉलिवूडला अॅक्शन, रोमान्स, कॉमेडी, सोशल ड्रामा आणि उत्तम देशभक्तीपर चित्रपट दिले आहेत. दरम्यान अक्षय त्याच्या चित्रपटांमुळे बराच चर्चेत असतो. २०२२ हे वर्ष त्याच्यासाठी आणि चित्रपटांसाठी इतके खास नव्हते. यावर्षात अक्षयने आपल्या चाहत्यांना सहा चित्रपट दिले, पण ते सहाच्या सहा चित्रपट फ्लॉप झाले. त्यामुळे तो चांगलाच सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
अक्षयने नुकतेच 'रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये त्याच्या दोन आगामी कलाकृतींची घोषणा केली आहे. आणि सोबतच आणखी एका विषयावरुन तो चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी अक्षयचा 'बेल बॉटम' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३३ कोटींच्या आसपास भारतात कमाई केली होती. तर जगभरात जेमतेम १४ कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे.
या चित्रपटावरुन सध्या बरेच वादंग निर्माण होताना दिसत आहे. एका पाकिस्तानी व्यक्तीने या चित्रपटावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा चित्रपट पाकिस्तानविरोधात बनवण्यात आल्याचे सांगितले. मात्र, खिलाडी कुमारनेही यावर सडेतोड उत्तरं दिली आहेत. सध्या अक्षय कुमार जेद्दाह, सौदी अरेबिया येथे रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला होता.
याच कार्यक्रमात एका संभाषणात एका पाकिस्तानी व्यक्तीने अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम' या चित्रपटाबद्दल प्रश्न केला, "मी पाकिस्तानचा आहे. अक्षय तु पॅडमॅन आणि टॉयलेटसारखे उत्तम चित्रपट केले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील काही संवेदनशील विषयावर भाष्य करणारा एक चित्रपट आहे, तो म्हणजे 'बेल बॉटम'. या चित्रपटातील काही गोष्टी पाकिस्तानच्या विरोधात होत्या. मला असे वाटते की, हा चित्रपट पाकिस्तान विरोधात आहे. "
पाकिस्तानी माणसाच्या या प्रश्नावर अक्षय कुमार म्हणाला, "हा फक्त एक चित्रपट आहे. याबद्दल इतके गंभीर होऊ नका. अशा अनेक गोष्टी आहेत. हा फक्त एक चित्रपट आहे." या चित्रपटाचे दिग्दर्शन रणजीत तिवारी यांनी केले आहेत. इंडियन एअरलाइन्सच्या विमानाच्या अपहरणानंतर एका प्रवाशाची सुटका करण्याच्या प्रयत्नावर ती आधारित होती.
या चित्रपटात अक्षयने भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला पण परदेशातून चित्रपटावर टीका झाली. कुवेत, कतार आणि सौदी अरेबियामध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. या चित्रपटात हुमा कुरेशी, लारा दत्ता आणि वाणी कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. हे 1980 च्या दशकात खलिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या वास्तविक अपहरणावर चित्रपट आधारित आहे. ज्यामध्ये भारतीय एअरलाइन्सद्वारे चालवल्या जाणार्या अनेक फ्लाइटचा समावेश होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.