आजकाल ऐतिहासिक, अॅक्शन, लवस्टोरी आणि थ्रिलर चित्रपटांची आवड प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामध्ये वेबसिरीज, शॉर्ट फिल्मस, वेगवेगळ्या भाषेतले चित्रपट प्रेक्षकांना बघायला आवडतात. या सगळ्यात मोलाचा वाटा हा इंटरनेटचा आहे. इंटरनेटमुळे आपण सहज कोणत्याही विषयाची माहिती मिळवू शकतो. आपण इंटरनेटमुळे अनेक नवे किंवा जुने चित्रपट सहज पाहू शकतो. सध्याच्या काळात ओटीटीवर अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ओटीटीवरील चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षकांना बाहेर जाण्याची गरज नसते.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे चित्रपटगृहात जावून चित्रपट पाहणे हे आताच्या पिढीला कंटाळवाणे वाटते. प्रत्येक जण आता आपल्या मोबाईल किंवा स्मार्ट डिवाइसेसवर चित्रपट पाहू लागले आहेत. त्याच्यामुळे चित्रपट निर्माते सगळ्यात जास्त चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करु लागले आहे. तज्ञांच्या मते, चित्रपटगृहात चित्रपट पाहिल्यामुळे तो अधिक समजतो आणि प्रेक्षक जास्त लक्षपुर्वक पाहू शकतात.
तुम्हाला मनोरंजनासाठी या महिन्यात काही चित्रपट पाहायचे असतील तर तुम्ही आताच प्लॅन करायला सुरुवात करु शकता. नुकताच 'नाद- द हार्ड लव्ह' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. तुम्हाला तुमच्या फॅमिली , फ्रेंड्स आणि जोडीदारासोबत या मराठी सिनेमांचा आंनद अनुभवता येवू शकतो. त्यात 'प्रकाश जनार्दन पवार ' यांनी दिग्दर्शन केले आहे. दुसरा चित्रपट म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवर भाष्य करणारा चित्रपट 'दि ए आय धर्मा स्टोरी '. यात मराठमोळा अभिनेता 'पुष्कर जोग ' आगळ्यावेगळ्या भुमिकेत आपल्याला दिसणार आहेत. हे दोन्ही चित्रपट २५ ऑक्टोबरला चित्रपट गृहात पाहू शकता.
'नाद- द हार्ड लव्ह' या चित्रपटात 'देवमाणूस' या गाजलेल्या मालिकांमधल्या अभिनेत्यांनी काम केले आहे. मोठ्या पडद्यावर या दोन अभिनेत्यांनी पदार्पण केले आहे. 'देवमाणूस' या मालिकेतील अभिनेता 'किरण गायकवाड' आणि ' सपना माने' या अभिनेत्रीने या चित्रपटात काम केले आहे. ही नवी जोडी पहिल्यांदा छोट्या पडद्यावरुन मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
Edited By: Sakshi Jadhav