Nimmi Property Case: ज्येष्ठ अभिनेत्रीच्या प्रोपर्टीवर डल्ला, १.७७ कोटींची रोकडही लंपास; केअरटेकरविरोधात मुंबईत गुन्हा दाखल

Nimmi Property Case: दिवंगत अभिनेत्री निम्मी यांच्या १.७७ कोटींच्या रोकड परस्पर काढल्याचा केअरटेकरवर आरोप आहे. याप्रकरणी मुंबईच्या सांताक्रूझ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Nimmi Property Case
Nimmi Property CaseSaam Tv
Published On: 

Nimmi Property Case: बॉलिवूडमधील ज्येष्ठ आणि दिवंगत अभिनेत्री निम्मी यांच्या प्रोपर्टीबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिनेत्रीच्या नावावर असलेल्या तब्बल १.७७ कोटी रुपयांच्या मुदत परस्पर काढून घेतल्याचा आरोप त्यांच्या केअरटेकरवर करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईतील सांताक्रूझ पोलिसांनी अस्रार शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. केवळ बँकेतील रक्कमचं नव्हे, तर अभिनेत्रीची कार विकणे आणि त्यांच्या फ्लॅटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सध्या मनोरंजन विश्वात चर्चा सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय?

दिवंगत अभिनेत्री नवाब बानो ऊर्फ निम्मी यांचे २५ मार्च २०२० रोजी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर प्रोपर्टीच्या व्यवहारांवरून हा वाद निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निम्मी यांच्या नावावर भारतीय स्टेट बँक (SBI) आणि सारस्वत बँकेत पैसे होते. यापैकी एसबीआयमध्ये १.२३ कोटी रुपये, तर सारस्वत बँकेत ५४ लाख रुपये जमा होते. ही एकूण १.७७ कोटी रुपयांच्या मुदत आरोपीने परस्पर काढून घेतल्याचा आरोप आहे. सांताक्रूझ पोलिसांनी ११ नोव्हेंबर रोजी अस्रार शेख याच्याविरोधात गुन्हा नोंदवला. मात्र, या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासाने बाकी आहे

केअरटेकरवर कार विकल्याचाही आरोप

निम्मी आणि त्यांचे पती, प्रसिद्ध पटकथालेखक अली रझा यांनी २००३ मध्ये जुहू तारा रोडवरील नेहा अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅट खरेदी केले होते. पतीच्या निधनानंतर घरकाम आणि प्रोपर्टीची देखभाल करण्यासाठी निम्मी यांनी अस्रार शेख याची मदत घेतली होती. याच काळात त्यांनी त्याच्यासोबत बँक खातीही उघडली होती. निम्मी यांच्या निधनानंतर आरोपीने त्यांच्या मालकीची मारुती सुझुकी सियाझ कार भंगारात विकल्याचा आरोप आहे. याशिवाय सांताक्रूझ पश्चिम येथील त्यांच्या दोन फ्लॅटचा ताबा घेण्याचाही प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मृत्युपत्रात दत्तक मुलासह नातेवाईकांचा उल्लेख

निम्मी यांनी निधनापूर्वी आपले मृत्युपत्र तयार केले होते. या मृत्युपत्रात त्यांनी दत्तक मुलगा अली सय्यद परवेझ आणि अन्य नातेवाईकांना वारसदार म्हणून नमूद केले होते. मात्र, परवेझ यांचेही डिसेंबर २०२० मध्ये ब्रिटनमध्ये कोविडमुळे निधन झाले. त्यानंतर परवेझ यांच्या पत्नीने कुटुंबाच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यासाठी एका नातेवाईकाला पॉवर ऑफ अटर्नी दिली. दरम्यान, निम्मी यांच्या मृत्युपत्रासंदर्भातील कायदेशीर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. सध्या मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.