'गुड न्यूज'नंतर आलिया भट्टचे नवे फोटो; नो-मेकअप लूकमध्ये दिसतेय 'लय भारी'

लंडनमध्ये चित्रपटाचे शूटिंग करत असलेली आलिया भट्टचे नवीन फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये ती आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत डिनर एन्जॉय करताना दिसत आहे.
Alia Bhatt Image
Alia Bhatt ImageSaam Tv

मुंबई : बॉलिवूड(Bollywood) अभिनेत्री आलिया भट्टनं(Alia Bhatt) काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून 'गुड न्यूज' असल्याचं जाहीर केलं होतं. सध्या ती प्रेग्नन्सीमुळं चर्चेत आहे. आलिया सध्या लंडनमध्ये आहे. तिथे तिच्या हॉलिवूड डेब्यू सिनेमा 'हार्ट ऑफ स्टोन'चं शूटिंग सुरू आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या सिनेमामध्ये आलिया 'वंडर वुमन' म्हणजेच गॅल गॅडॉट आणि 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' अभिनेता जेमी डोर्ननसोबत दिसणार आहे.

Alia Bhatt Image
अंकिता लोखंडे डीप नेक ड्रेसमुळं ट्रोल; यूजर्स म्हणाले 'आता राखीही सुधारली आहे!'

दरम्यान, लंडनमधून आलियाचा एक नवीन अपडेटेड फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये ती तिची बहीण शाहीन भट्ट आणि इतर कुटुंबातील सदस्यांसोबत दिसत आहे. नवीन फोटोमध्ये आलिया मेकअपशिवाय कॅज्युअल ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहे.

Alia Bhatt Image
अभिनेत्री उदिता गोस्वामीचे लेटेस्ट फोटो पाहून चाहते थक्क, म्हणाले - ही तिच आहे का?

आलियाचा नवा फोटो एका चाहत्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. ज्यामध्ये आलिया करण जोहरसोबत पोज देताना दिसत आहे. याशिवाय, आणखी एका फोटोमध्ये आलिया शाहीन भट्ट, रीमा कपूर, अरमान जैन आणि इतर कुटुंबीयांसोबत फोटो काढताना दिसत आहे.

आलियासोबत दिग्दर्शक करण जोहर, करीना कपूर, मनीष मल्होत्रा, रणवीर सिंग आणि सोनी राजदान तसेच इतर अनेक स्टार्स लंडनमध्ये आहेत. दरम्यान, करण जोहरने रणवीर सिंग आणि आलियाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. रणवीर सिंग आणि आलियाचा फोटो शेअर करताना करण जोहरने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी रॉकी आणि राणीला शोधले '.

आलिया लंडनमध्ये शूटिंगसोबतच तिच्या फॅमिली टाईमचा खूप आनंद घेत आहे. 'हार्ट ऑफ स्टोन'च्या शूटिंगसोबतच आलिया करण जोहरच्या 'रॉकी रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचे शूटिंग करत असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात आलिया रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर आणि आलियासोबत धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आज़मी देखील महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com