अंकिता लोखंडे डीप नेक ड्रेसमुळं ट्रोल; यूजर्स म्हणाले 'आता राखीही सुधारली आहे!'

अंकिता लोखंडे नुकतीच पती विकी जैनसोबत एका इव्हेंटमध्ये गेली होती. या इव्हेंटसाठी तिने डीप नेकचा चमकदार हिरवा गाऊन घातला होता. परंतु कारमधून उतरताना ती त्या गाऊनमध्ये कम्फर्टेबल नव्हती.
Ankita Lokhande get troll, Bollywood News in Marathi, Entertainment News
Ankita Lokhande get troll, Bollywood News in Marathi, Entertainment NewsSaam Tv
Published On: 

मुंबई: चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) लग्न झाल्यापासून खूपच चर्चेत आहे. अंकिता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टीव्ह असते. ती अनेकदा तिच्या फोटोंसह व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) शेअर करत असते. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने डीप नेकचा ड्रेस घातला आहे. जो तिला स्वतःला सावरता येत नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.(Bollywood News in Marathi)

Ankita Lokhande get troll, Bollywood News in Marathi, Entertainment News
Ek Villain Returns Trailer: नेमका व्हिलन कोण? जॉन अब्राहम की अर्जुन कपूर? पाहा सस्पेन्स ट्रेलर

अंकिता लोखंडे नुकतीच पती विकी जैनसोबत एका इव्हेंटमध्ये गेली होती. या इव्हेंटसाठी तिने डीप नेकचा चमकदार हिरवा गाऊन घातला होता. परंतु कारमधून उतरताना ती त्या गाऊनमध्ये कम्फर्टेबल नव्हती. त्यामुळे नेटकरी सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत.(Entertainment News)

Ankita Lokhande get troll, Bollywood News in Marathi, Entertainment News
शाहीद कपूरने पुन्हा वाढवली फी, फ्लॉप 'जर्सी'नंतर पुढच्या प्रोजेक्टसाठी मागितले इतके कोटी

जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्या व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडे ही तिच्या कारमधून उतरत आहे. परंतु डीप नेकचा गाऊन घातल्यामुळे तिला दोन्ही हातांनी क्लीवेज झाकत कारमधून खाली उतरावे लागले. यावेळी ती खूप अनकम्फर्टेबल दिसत होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून ट्रोल केलं जात आहे.

एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत 'तुम्ही कम्फर्टेबल नसताना असे कपडे घालून का बाहेर जाता?' असा प्रश्न विचारला. 'हिचे संस्कार आता कुठे गेले आहेत?, असे एका यूजरने विचारले. तर 'आता राखी सावंतही सुधारली असून तिने असे कपडे घालणे सोडले आहे', असं एका यूजरनं उपरोधानं म्हटलं आहे.

काही महिन्यांपूर्वी अंकिता लोखंडे आणि विकी जैन 'स्मार्ट जोडी' या रिअॅलिटी शोचे विजेते ठरले होते. त्यांना 'स्मार्ट जोडी'च्या ट्रॉफीसोबत २५ लाखांचे रोख पारितोषिकही मिळाले होते. अंकिता आणि विकीसाठी त्यांचा हा विजय खूप खास होता. कारण त्यांच्या लग्नानंतर काही दिवसांनी या जोडप्याने रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com