शाहीद कपूरने पुन्हा वाढवली फी, फ्लॉप 'जर्सी'नंतर पुढच्या प्रोजेक्टसाठी मागितले इतके कोटी

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहीद कपूरने 'जर्सी'सारखा फ्लॉप चित्रपट दिल्यानंतरही शाहिदने त्याची फी वाढवली असल्याची माहिती आहे. बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये शाहीद कपूरचे क्रेझ कायम आहे.
Shahid Kapoor has increased his fees
Shahid Kapoor has increased his feesSaam Tv

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहीद कपूरने (Sahid Kapoor) 'कबीर सिंग' चित्रपटानंतर जवळपास दोन वर्षांनंतर 'जर्सी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. परंतु, त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याचा चित्रपट फ्लॉप ठरला. मात्र, असे असूनही बॉलिवूड(Bollywood) आणि चाहत्यांमध्ये शाहीद कपूरचे क्रेझ कायम आहे. दरम्यान, 'जर्सी'सारखा फ्लॉप चित्रपट दिल्यानंतरही शाहिदने त्याची फी वाढवली असल्याची माहिती आहे. माहितीनुसार, शाहीदने त्याच्या पुढील प्रोजेक्टसाठी ३८ कोटी रुपयांची मागणी केली आहे.

Shahid Kapoor has increased his fees
अथिया शेट्टीने केएल राहुलवर केला प्रेमवर्षाव; बॉयफ्रेंडच्या शस्त्रक्रियेनंतरचा फोटो केला शेअर

शाहीदने त्याच्या फीमध्ये पुन्हा वाढ केली आहे. शाहीद लवकरच एक नवीन अॅक्शन थ्रिलर सिनेमा करणार आहे. या सिनेमासाठी त्याने दिग्दर्शकांकडे ३८ कोटींची मागणी केली आहे. माहितीनुसार, अभिनेत्याने त्याच्या फीमध्ये ५ कोटी रुपयांनी वाढ केली आहे. शाहीद कपूरने 'जर्सी'साठी ३१ ते ३३ कोटी रुपये फी घेतली होती.

Shahid Kapoor has increased his fees
उदयपूर घटनेचा उर्फी जावेदनं नोंदवला निषेध, परखड बोलली; येऊ लागले धमकीचे मेसेज, तुला...

शाहीदचे आगामी चित्रपट

शाहीदकडे अजून दोन मोठे चित्रपट आहेत. यामध्ये एक राज-डीके दिग्दर्शित 'फर्जी' आणि दुसरा अली अब्बास जफर दिग्दर्शित 'ब्लडी डॅडी' या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र, शाहीदने एवढ्या फीची मागणी नक्की कोणत्या दिग्दर्शकाकडून केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, शाहीद कपूरच्या या मागणीमुळे चित्रपटाचे दिग्दर्शक आश्चर्यचकित झाल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या वर्षीही शाहीदने मानधनात वाढ केल्याचे वृत्त होते. जर्सी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान शाहीदला याबाबत विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, 'आपले काम आहे की आपल्या कामाचे पैसे आपण मागितले पाहिजेत. जर चित्रपटाच्या निर्मात्याला वाटत असेल की तुमचे काम तेवढे चांगले आहे, तर तो तुम्हाला तेवढीच फी वाढवून देईल, अन्यथा तुम्हाला ते काम मिळणार नाही. आजकाल रिक्षाचालकही भाडे वाढवत ​​आहेत. त्यात काहीच गैर नाही'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com