Ek Villain Returns Trailer: नेमका व्हिलन कोण? जॉन अब्राहम की अर्जुन कपूर? पाहा सस्पेन्स ट्रेलर

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर बोलबाला झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूप आवडला आहे. ट्रेलर पाहून असे वाटते की यावेळी चित्रपटात आणखी सस्पेन्स पाहायला मिळणार आहे.
Ek Villain Returns the trailer
Ek Villain Returns the trailerSaam Tv
Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham)आणि अर्जुन कपूर(Arjun Kapoor) यांचा 'एक व्हिलन रिटर्न्स'(Ek Villain Returns) या चित्रपटचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. या चित्रपटात दिशा पटानी(Disha Patani) आणि तारा सुतारिया(Tara Sutaria) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Ek Villain Returns the trailer
अथिया शेट्टीने केएल राहुलवर केला प्रेमवर्षाव; बॉयफ्रेंडच्या शस्त्रक्रियेनंतरचा फोटो केला शेअर

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूपच आवडला आहे. ट्रेलर पाहून असे वाटते की यावेळी चित्रपटात आणखी सस्पेन्स पाहायला मिळणार आहे. कारण, ट्रेलर अनेकदा पाहिल्यानंतरही समजत नाही की, यावेळी खलनायक नक्की कोण आहे, जॉन अब्राहम की अर्जुन कपूर? ट्रेलरमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, मुलींवर हल्ला केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तरुणांचे एकतर्फी प्रेम असलेल्या मुलींनाच लक्ष्य केले जात असल्याचे यात दाखवण्यात आले आहे.

Ek Villain Returns the trailer
उदयपूर घटनेचा उर्फी जावेदनं नोंदवला निषेध, परखड बोलली; येऊ लागले धमकीचे मेसेज, तुला...

दिग्दर्शक मोहित सुरी दिग्दर्शित हा चित्रपट २०१४ मध्ये आलेल्या 'एक व्हिलन' चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख दिसले होते आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. माहितीनुसार, या चित्रपटाचे बजेट जवळपास ३५ कोटी रुपये होते. या चित्रपटाने जवळपास १७० कोटींची कमाई करून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

आता 'एक व्हिलन रिटर्न्स'चा बॉक्स ऑफिसवर किती यशस्वी होतो हे पाहावं लागेल. तसे पाहता हा चित्रपटही प्रेक्षकांना खूप आवडेल, असे बोलले जात आहे. हा एक अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. जो पुढील महिन्यात २९ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com