अभिनेत्री उदिता गोस्वामीचे लेटेस्ट फोटो पाहून चाहते थक्क, म्हणाले - ही तिच आहे का?

इमरान हाश्मीसोबत तिची केमिस्ट्री सर्वात जास्त गाजली.
Uditaa Goswami news, Bollywood News, Entertainment News
Uditaa Goswami news, Bollywood News, Entertainment NewsSaam Tv

मुंबई - उदिता गोस्वामीने (Uditaa Goswami) फार कमी चित्रपटांमध्ये काम केले, पण चाहत्यांच्या हृदयात तिने खास स्थान निर्माण केले. इमरान हाश्मीसोबत (Imran Hashmi) तिने जहर आणि अक्सर यांसारख्या चित्रपटांतून धमाल केली. त्याचवेळी, पाप चित्रपटात ती जॉन अब्राहमच्या (John Abraham) बरोबर काम केले. या चित्रपटात तिची जॉनसोबतची तिची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली होती. पापमध्ये ती कायाच्या भूमिकेत दिसली. त्याचवेळी इमरान हाश्मीसोबत तिची पडद्यावरची केमिस्ट्री पाहून तरुणांनाही त्यावेळी तिचे वेड लागले होते. नंतर ती चित्रपटांमधून गायब झाली.(Entertainment News in Marathi)

डेहराडूनमध्ये जन्मलेली उदिता अभिनेत्री असण्यासोबतच एक मॉडेल देखील आहे. तिचे वडील बनारसचे तर आई शिलाँगची आहे. इमरान हाश्मी आणि जॉन अब्राहमसोबत पडद्यावरची तिची केमिस्ट्री चाहत्यांनी चांगलीच पसंत केली होती. नंतर ती तिच्या चित्रपट दिग्दर्शक मोहित सूरीच्या अफेअरमुळे चर्चेत आली आणि बराच काळ डेट केल्यानंतर तिने २०१३ साली मोहितसोबत लग्न केले. मोहित आणि त्यांना दोन मुले आहेत.

Uditaa Goswami news, Bollywood News, Entertainment News
घरातील कुकने दिली जीवे मारण्याची धमकी, माही विजने सांगितली आपबिती

बराच काळ पडद्यापासून दूर राहिल्यानंतर, उदिता २०१४ मध्ये तिचा पती मोहित सुरीचे कथित कॉल डिटेल्स मिळवल्यामुळे प्रसिद्धीझोतात आली. या प्रकरणावरून बराच वाद झाला होता. आणि बराच काळ ही बातमी प्रसारमाध्यमात सुरु होती. मात्र, या घटनेनंतरही मोहित आणि ती वेगळे झाले नाहीत. उदिता तिच्या कुटुंबासह आनंदी आहे. उदिता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि चाहत्यांसह फोटो व्हिडिओ शेअर करत असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com