घरातील कुकने दिली जीवे मारण्याची धमकी, माही विजने सांगितली आपबिती

अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Jay Bhanushali And Mahhi Vij
Jay Bhanushali And Mahhi VijSaam Tv
Published On

मुंबई - जय भानुशाली (Jay Bhanushali) आणि माही विज (Mahhi VIj)हे टीव्हीच्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानले जातात, आता अलीकडेच या सेलिब्रिटी कपलबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वास्तविक, माही आणि जयच्या घरातील कुकने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. केवळ जय आणि माहीच नाही तर कुकने त्यांच्या 2 वर्षाच्या मुलीलाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अशा परिस्थितीत दोघेही आपल्या मुलीसाठी खूप चिंतेत दिसत आहेत. माही आणि जय यांनी त्यांच्याकुकविरोधात पोलिसांत तक्रारही केली आहे.

हे देखील पाहा -

माही विज आणि जय भानुशाली यांनी गुरुवारी पोलीस ठाण्यात जाऊन कुकविरोधात तक्रार केली. माही विजने एका मुलाखतीत कुकने दिलेल्या धमकीला दुजोरा दिला. या मुलाखतीदरम्यान माहीने सांगितले की, कूकला कामाला येऊन फक्त तीन दिवस झाले होते तेव्हाच आम्हाला मुलीला सांभाळणाऱ्या नॅनीने त्या कुकविषयी सांगितलं होत. त्या कूकला कामाला येऊन फक्त तीन दिवस झाले होते, तेव्हाच नॅनीने आम्हाला त्या कुकने केलेल्या चोरीविषयी सांगून जागरूक केलं.

Jay Bhanushali And Mahhi Vij
यात्रीगण कृपया ध्यान दे! रेल्वेने रद्द केल्यात 101 ट्रेन; प्रवास करण्यापूर्वी रद्द गाड्यांची यादी तपासा

पण जयला याबद्दल सांगण्याआधी वाट पाहणे मला बरे वाटले. जेव्हा जय आला तेव्हा त्याला मी हे सगळं सांगितलं. त्यानंतर जयने त्या कुकचे ३ दिवसाचे पैसे दिले आणि तू आता जा असे सांगितले. पण तो पूर्ण महिन्याचे पैसे मागे लागू लागला. यावरून ही बाचाबाची इतकी वाढले की, त्याने या दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. जेव्हा जयने त्याला कामावरुन काढून टाकण्याचं कारण सांगितलं तेव्हा तेव्हा त्याने , “200 बिहारी आणून उभे करेल, असं म्हणत दारूच्या नशेत त्याने आम्हाला शिवीगाळ केली. आम्ही पोलिसांकडे गेलो. मला माझी भीती नाही. पण माझ्या मुलीसाठी मला भीती वाटत आहे. असं तिने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com