
Dabba Cartel Trailer: ओटीटी प्लॅटफॉर्म नेहमीच काहीतरी वेगळे पाहायला मिळते. नुकत्याच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने एका नविन शोची घोषणा केली आहे. नेटफ्लिक्सने आता महिला ड्रग माफियांवर आधारित 'डब्बा कार्टेल' या नव्या शोची घोषणा केली आहे, या शोचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे.
'डब्बा कार्टेल' या दिवशी प्रदर्शित होणार आहे.
नेटफ्लिक्सचा हा आगामी शो २८ फेब्रुवारीपासून ओटीटीवर प्रसारित होईल, यामध्ये शबाना आझमी, गजराज राव, ज्योतिका, निमिषा सजयन, शालिनी पांडे, अंजली आनंद, सई ताम्हणकर, जिशु सेनगुप्ता, लिलेट दुबे आणि भूपेंद्र सिंग जादावत यांसारखे दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील. महिलांवर आधारित या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोचे दिग्दर्शन हितेश भाटिया यांनी केले आहे आणि फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी निर्मिती केली आहे.
मालिकेची कथा काय आहे?
'डब्बा कार्टेल'ची कथा ठाणे, मुंबई येथे राहणाऱ्या ५ महिलांभोवती फिरते, या सामान्य महिलांप्रमाणे टिफिन सेवा चालवतात. कथेत ट्विस्ट येतो जेव्हा हे उघड होते की या महिला टिफिन सेवेच्या नावाखाली ड्रग माफिया देखील चालवत आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा हे सत्य बाहेर येते तेव्हा या महिलांच्या अडचणी वाढतात. शोच्या ट्रेलरमध्ये आपल्याला याची झलक दिसते.
मालिकेच्या निर्मात्याने काय म्हटले?
मालिकेच्या निर्मात्या शिबानी अख्तर म्हणाल्या, 'डब्बा कार्टेलसोबत आम्हाला एका गृहिणीचा प्रवास अनुभवायचा होता. ही मैत्री, विश्वासघात आणि सत्तेची कहाणी आहे. जे अशा जगाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे ज्याचा भाग असण्याची या महिलांनी कधीही कल्पना केली नव्हती. या मालिकेचा एक रोमांचक अनुभव प्रेक्षकांना देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.