National Award Winner Actress Uttara Baokar Passes Away
National Award Winner Actress Uttara Baokar Passes AwaySaam TV

Uttara Baokar Passed Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे निधन

National Award Winner Actress Uttara Baokar: अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले.
Published on

Uttara Baokar Death News: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी, हिंदी चित्रपट व मालिकांतील ख्यातनाम अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. उत्तरा यांच्या पश्चात एक भाऊ, एक बहीण, वहिनी व भाचा आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या उत्तरा बावकर यांचे दीर्घ आजाराने पुणे येथे निधन झाले. त्याच्या कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

 National Award Winner Actress Uttara Baokar Passes Away
Jugadya: आयुष्यातील अडचणींना तोंड देणारा ‘जुगाड्या’ १४ एप्रिलला होणार प्रदर्शित, ‘हा’ बडा अभिनेता करणार मराठी चित्रपटात पदार्पण

अभिनय व आवाजी अभिनय यावर त्यांची हुकूमत होती. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामात त्यांनी अनेक वर्षे अध्यापनाचे काम केले.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे बारकावे शिकलेल्या उत्तरा बावकर यांनी 'मुख्यमंत्री'मध्ये पद्मावती, 'मीना गुर्जरी'मध्ये मीना, शेक्सपियरच्या 'ऑथेलो'मध्ये डेस्डेमोना आणि नाटककार गिरीश कर्नाड यांच्या 'तुघलक' नाटकात आईची भूमिका साकारली होती. त्यांनी लोकप्रिय नाटकांमध्ये संस्मरणीय पात्रे साकारली.

 National Award Winner Actress Uttara Baokar Passes Away
The Marvelsच्या Teaserची सोशल मीडियावर हवा; कॅप्टन मार्व्हलसोबत दिसणार मिसेस मार्व्हेल्सचीही कमाल

गोविंद निहलानी दिग्दर्शित 'तमस' या चित्रपटातील अभिनयानंतर उत्तरा बावकर प्रसिद्धीच्या झोतात आली. सुमित्रा भावे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटातही त्यांनी काम केले. याशिवाय त्यांनी उडान, अंतराल, रिश्ते कोरा कागज, नजराना, जस्सी जैसी कोई नहीं आणि जब लव हुआ यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com