The Marvelsच्या Teaserची सोशल मीडियावर हवा; कॅप्टन मार्व्हलसोबत दिसणार मिसेस मार्व्हेल्सचीही कमाल

मार्व्हल्सच्या सुपरहिरो चित्रपटांचे जगभरात चाहते आहेत. अशातच कॅप्टन मार्व्हल्सच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे.
The Marvels Teaser
The Marvels TeaserSaam Tv

The Marvels Teaser: मार्व्हल्सच्या सुपरहिरो चित्रपटांचे जगभरात चाहते आहेत. अशातच कॅप्टन मार्व्हल्सच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा पुढील चित्रपट ‘द मार्व्हल्स’ या वर्षी प्रदर्शित होणार असून त्याचा पहिला टीझर प्रदर्शित झाला आहे. त्याचवेळी चाहत्यांची उत्सुकता वाढवत निर्मात्यांनी आता चित्रपटाचा पहिला टीझर हिंदीमध्ये प्रदर्शित झाला आहे.

The Marvels Teaser
Chikatgunde 2 Trailer: सामाजिक विषय, लॉकडाऊनमधील वास्तव येणार ओटीटीवर; ‘चिकटगुंडे २'चा ट्रेलर प्रदर्शित

मार्व्हल्सच्या आगामी चित्रपटात ‘द मार्व्हल्स’मध्ये कॅप्टन मार्व्हल एकटी नसून तिच्यासोबत आणखी दोन सुपरहिरो आहेत. त्यापैकी एक मिस मार्वल म्हणजेच कमला खान आणि दुसरी मोनिका. मार्वल युनिव्हर्सला नेहमीच फॉलो करणाऱ्या चाहत्यांना हे माहित असेल की, गेल्या वर्षी डिस्ने प्लस हॉटस्टारवर मार्व्हल्स युनिव्हर्समधला एक चित्रपट प्रदर्शित झाला होती. त्यात प्रेक्षकांना मिस मार्व्हलची ओळख झाली होती. (latest entertainment news)

The Marvels Teaser
Sanjay Dutt Injured: मोठी बातमी: 'केडी-द डेव्हिल'च्या शूटिंगदरम्यान संजय दत्तला गंभीर दुखापत, हात-चेहऱ्यावर जखम

मिस मार्व्हलचे पात्र कमला खान साकारत असून ती कॅप्टन मार्व्हलची फार मोठी फॅन आहे. जेव्हा कमला सुपर वुमन मिस मार्व्हल बनते तेव्हा तिचा लूक आणि गेटअप कॅप्टन मार्व्हलसारखाच असतो. ‘द मार्व्हल्स’ सिनेमॅटिक युनिव्हर्सचा नवीन चित्रपट द मार्व्हल्स या दोन पात्रांना एकत्र आणतो आणि जेव्हा ही दोन पात्रे भेटतात तेव्हा नशिबात येणे निश्चित आहे. ‘द मार्व्हल्स’ या वर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे. त्याचा पहिला टीझर मंगळवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कमलाच्या वडिलांची भूमिका भारतीय अभिनेता मोहन कपूर सुद्धा प्रमुख भूमिकेत आहे.(Maharashtra Breaking News)

टीझरमध्ये शिल्डचे एक्स डायरेक्टर निक फ्युरी यांच्या पुढाकाराने कॅप्टन मार्व्हल मिस मार्व्हलला शोधत असल्याचे दाखवले आहे. दोघे मोनिका रॅम्बोसोबत मिशनवर निघाले आहेत. ‘द मार्व्हल्स’ हा कॅप्टन मार्व्हलचा सिक्वेल आणि मिस मार्व्हल मालिकेचा सिक्वेल आहे.

ब्री लार्सन कॅप्टन मार्व्हलच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर इमान वेलानीने मिस मार्व्हलचे पात्र पुढे नेले आहे. तेयोनाह परिसीने मोनिकाची भूमिका केली आहे. या भागात सॅम्युअल जॅक्सन निक फ्युरीच्या भूमिकेत परतला आहे.

मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा ३३ वा चित्रपट निया डाकोस्टा यांनी दिग्दर्शित केला आहे. भारतात, हा चित्रपट १० नोव्हेंबर रोजी तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडसह हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com