Mumbai: प्रसिद्ध गायक सोनू निगमला धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील चेंबूर भागात एका कार्यक्रमात गायक सोनू निगमला धक्काबुकी करण्यात आली आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हल्ल्यानंतर गायक सोनू निगमला चेंबूर नाका येथील झेन हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. (Mumbai)
याबाबत अधिक माहिती अशी की, चेंबूर फेस्टिवलमध्ये सोनू निगम गाणे गाण्यासाठी आला होता. यावेळी ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फरतेपेकर यांचे कार्यकर्ते आणि सोनू निगमच्या अंगरक्षकांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. याचवेळी त्यांच्यात धक्काबुक्की झाली.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कार्यक्रम संपल्यानंतर सोनू निगम त्याच्या असिस्टंटसोबत स्टेज वरून खाली उतरत असताना सेल्फी घेण्यासाठी आलेली लोक त्याच्या जवळ जात होती. यावेळी त्यांना बाजूला करत असताना असिस्टंटला धक्काबुक्की झाल्याने तो पायऱ्यांवरून खाली पडल्याचे दिसत आहे.
दरम्यान, यामध्ये सोनू निगमला (Sonu Nigam) कोणतीही दुखापत झालेली नाही नसून जैन हॉस्पिटलमध्ये थोड्या वेळापूर्वी सोनू निगमच्या असिस्टंटला उपचारासाठी आणलं होतं मात्र आता त्याला घरी पाठवण्यात आले आहे. याबाबत अद्याप कोणतीही तक्रार आलेली नसल्याची माहितीकायदा व सुव्यवस्था सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.