Mukesh Khanna On Saif Ali Khan: ‘सैफ रावण नाहीतर...’ ‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्नांचे आदिपुरूषवर टीकास्त्र

Mukesh Khanna Statement On Adipurush Character: सगळ्याच स्तरातून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत असताना एका प्रसिद्ध अभिनेत्याने सैफ अली खानला त्याच्या भूमिकेवरून टीका केली आहे.
Mukesh Khanna On Saif Ali Khan
Mukesh Khanna On Saif Ali KhanInstagram
Published On

Mukesh Khanna Statement: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपट सध्या कमालीचा चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होताच चित्रपटाला वादाची किनार मिळाली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांसोबत दिग्दर्शक आणि लेखक सुद्धा बरेच वादाच्या भोवऱ्यात अडकले. चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस झाले असून चौथ्या दिवशीच चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. सगळ्याच स्तरातून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत असताना एका प्रसिद्ध अभिनेत्याने सैफ अली खानला त्याच्या भूमिकेवरून टीका केली आहे.

Mukesh Khanna On Saif Ali Khan
Asit Modi Reacts: गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘तारक मेहता का...’ निर्मात्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘सध्या पोलीसांकडून...’

‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना यांनी आदिपुरुष चित्रपटातून रामायणाचा अपमान झाला असून त्यांनी सैफ अली खानच्या भूमिकेबद्दलही भाष्य केलं आहे. यापूर्वी मुकेश खन्ना यांनी चित्रपटावर देखील टीका केली आहे. त्यांनी चित्रपटाविषयी पोस्ट केली होती, त्या पोस्टमध्ये मुकेश खन्ना म्हणतात, “ आदिपुरूष सध्याच्या काळातील सर्वात जास्त विनोदी चित्रपट आहे. आपला पवित्र ग्रंथ वाल्मिकी रामायणाचा या चित्रपटातून अपमान करण्यात आला आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला परवानगीच कशी काय दिली?, प्रेक्षक या लोकांना माफ करतील का?, सर्वाधिक खर्चिक असलेला हा चित्रपट प्रेक्षक त्याला नक्कीच फ्लॉप ठरवतील.”

चित्रपटावर टीका केल्यानंतर अभिनेत्याने आता सैफ अली खानवर टीका केली आहे. अभिनेत्याने ही टीका एका व्हिडिओच्या माध्यमातून केली, मुकेश खन्ना व्हिडीओत म्हणतात, “रावण विचित्र आणि भयानक दिसू शकतो पण चंद्रकांतामधील शिवदत्त-विश्वरूप सारखा कसा काय दिसू शकतो? चित्रपटात रावणाचा अभिनय आणि सादरीकरण खूपच विनोदी झालंय. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून रावणाचे पात्र वेगळ्या पद्धतीने साकरायचे असे बोलले होते. पण मी त्यांना ‘महाकाव्यातील पात्रांमध्ये बदल करणारे तुम्ही कोण?’ असा प्रश्न केला.”

Mukesh Khanna On Saif Ali Khan
‘Dabangg 3’ Actress Hema Sharma Claims: ‘दबंग ३’ फेम अभिनेत्रीचे सलमानच्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप; म्हणाली, ‘श्वानासारखे बाहेर...’

त्यानंतर पुढे मुकेश खन्ना म्हणतात, चित्रपटात ओम राऊतला रावणाच्या भूमिकेसाठी सैफ अलीलाच घ्यावंसं वाटलं?, त्याच्याहून देखील उत्तम कलाकार बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नाहीये का?, चित्रपटात सैफ रावण नाहीतर एक तस्करी करणारा गुंड दिसतोय. हा एक चित्रपटनसून तमाशा आहे.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान, सनी सिंग आणि देवदत्त नागे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com