Mouni Roy: घटस्फोटाच्या वृत्ताने खळबळ! मौनी रॉयच्या लग्नाबाबत समोर आलेलं 'हे' सत्य नक्की काय?

Mouni Roy: अभिनेत्री मौनी रॉय आणि पती सूरज नांबियार यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना जोर आला आहे. इंस्टाग्रामवरील हालचालींमुळे त्यांच्या नात्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
Mouni Roy
Mouni RoySaam Tv
Published On

Mouni Roy: प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नंबियार यांच्या वैवाहिक जीवनात वादळ आले आहे. हे कपल त्यांच्यातील अडचणींमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. जेव्हा काही नेटकऱ्यांच्या लक्षात आले की मौनी आणि सूरज यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे, तेव्हापासून त्यांच्या डिव्होर्स झाल्याच्या अफवा सुरू झाल्या.

अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की मौनी रॉय आणि सूरज नंबियार काही काळापासून वेगळे राहत होते, परंतु आता त्यांचा डिव्होर्सआधीच झाल्याचे बोलले जात आहे.

Mouni Roy
Famous Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याच्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ४७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मौनी रॉय आणि सूरज नंबियार यांचा घटस्फोट झाला का?

२०२२ मध्ये मौनी रॉय आणि बिझनेसमॅन सूरज नंबियार यांचे लग्न झाले. एबीपी न्यूजच्या 'सास बहू और साजिश' या शोनुसार, मौनी रॉय आणि सूरज नंबियार केवळ वेगळे राहत नाहीत, तर त्यांचा घटस्फोटही झाला आहे. पण, या कपलने अद्याप त्यांच्या वादग्रस्त वैवाहिक जीवनावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Mouni Roy
Alia Bhatt: आलिया भट्टचा ग्लॅमरस 'ड्रिमी बार्बी' लूक पाहून चाहते फिदा; कान्समधील फोटो तुफान व्हायरल

२०१९ मध्ये एका मित्राने त्यांची ओळख करुन दिली

'नागिन' अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नंबियार यांची पहिली भेट २०१९ च्या नवीन वर्षाच्या दिवशी एका मित्रामुळे झाली. दोन वर्षे डेट केल्यानंतर, या जोडप्याने २०२२ मध्ये गोव्यात मल्याळम आणि बंगाली पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नाला मंदिरा बेदी, अर्जुन बिजलानी, आश्का गोरडिया, आमना शरीफ आणि मीट ब्रदर्स यांच्यासह केवळ जवळचे मित्र उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com