Ameya Khopkar : पाकिस्तानी चित्रपट रिलीज नाहीच, अभिनेता आला तर हात-पाय तोडणार, मनसे नेत्याचा इशारा

MNS Ameya Khopkar Warning : "पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही" असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी आपले स्पष्ट मत मांडले आहे. वाचा ते काय बोलले...
MNS Ameya Khopkar Warning
Ameya KhopkarSAAM TV
Published On

लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि माहिरा खान यांचे भारतात देखील खूप चाहते आहेत. फवाद खानच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. नुकताच त्यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'द लिजेंड ऑफ मौला जट' लवकरच भारतात होणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे.

या घोषणेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS ) पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकार आणि चित्रपटांविरोधात विरोध दर्शवला आहे. "एकही पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही" असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच जर कोणी पाकिस्तानी कलाकार भारतात आला तर त्यालाही मारहाण केली जाईल. असे ते बोले आहेत.

एका मिडिया मुलाखतीत अमेय खोपकर यांना पाकिस्तान चित्रपटाच्या विरोधा मागचे कारण विचारले त्यावर यांनी सांगितले की, "आपल्या देशावर पाकिस्तानकडून सातत्याने हल्ले होत आहेत. गेल्या आठवड्यातही असे हल्ले झाले होते ज्यात आपले जवान शहीद झाले. आपल्या देशातील अनेक शहरांमध्येही हल्ले होतात, जिथे आपले चांगले पोलीस अधिकारी शहीद होतात. अशा परिस्थितीत पाकिस्तानची कला कशाला हवी? आपल्या देशात कलाकार नाहीत का? इथे चित्रपट बनत नाहीत का? पाकिस्तानातील कलाकारांची गरज का आहे?"

ते पुढे म्हणाले, "आम्हाला त्यांचे कलाकार नको आहेत. आम्ही पाकिस्तानातील कोणताही कलाकार किंवा चित्रपट येथे प्रदर्शित होऊ देणार नाही." अशा तीव्र शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच त्यांनी पुढे कला आणि संस्कृतीला राजकारणापासून वेगळे ठेवण्यावर आपले मत मांडले. ते म्हणाले की, 'कला आणि संस्कृती आणि राजकारण या वेगळ्या गोष्टी आहेत, मात्र तीच कला जेव्हा आपल्या देशावर आक्रमण होते तेव्हा अशी कला आपल्याला नको असे ते म्हणाले. आपल्यासाठी देश आधी येतो, मग कला. असे अमय खोपकर म्हणाले.

MNS Ameya Khopkar Warning
Ashok Saraf: महाराष्ट्राच्या महानायक पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार; Colors मराठीवर प्रेक्षकांना खळखळून हसवणार

अमेय खोपकर यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींना देखील संदेश दिला आहे की, "बॉलिवूडच्या लोकांना लाज वाटली पाहिजे. आपल्या देशात खूप टॅलेंट आहे, मग पाकिस्तानातून कलाकार आणायची काय गरज? तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी आम्ही कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला इथे येऊन चित्रपट प्रदर्शित करू देणार नाही" पाकिस्तानी कलाकार इथे येऊन चित्रपट प्रदर्शित करतील म्हणून मी येथे सांगू इच्छितो की, "असा प्रमोशनचा विचारही करू नका, नाहीतर मार खाल, तुमचे हात-पाय तोडून टाकू" अशा गंभीर शब्दात इशारा दिला आहे.

2016 मध्ये उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र 2023 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सांस्कृतिक, एकता आणि शांततेसाठी हा बंदी उठवली गेली. यामुळे पाकिस्तानी कलाकारांना भारताची दारे उघडी झाली. त्यामुळे 3 ऑक्टोबर ला 'द लिजेंड ऑफ मौला जट' चित्रपट भारतात प्रदर्शित करण्याची घोषणा केली गेली.

MNS Ameya Khopkar Warning
Hrithik Roshan Background Dancer : हृतिक रोशनच्या मागे डान्स करणारा 'तो' कोण? बॉलिवूडचा सुपरस्टार ओळखलात का?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com