Miss Universe : भारतीय वंशाच्या मुलीकडून ताज हिसकावला, ब्‍यूटी क्‍वीन स्पर्धेतील वाद चव्हाट्यावर

Miss Universe Fiji Beauty Contest Controversy : मनशिका प्रसादने मिस युनिव्हर्स फिजीचा ताज जिंकला. मात्र दोन दिवसांनंतर हा किताब तिच्याकडून हिसकावून घेण्यात आला आणि तो किताब उपविजेत्या नादिन रॉबर्ट्सला देण्यात आला. सविस्तर प्रकरण काय? जाणून घेऊयात.
Miss Universe Fiji Beauty Contest Controversy
Miss Universe FijiSAAM TV
Published On

फिजीमध्ये भारतीय वंशाचे लोक मोठ्या संख्येने राहतात.अशीच एक भारतीय वंशाची 24 वर्षीय MBA विद्यार्थिनी तेथे राहते. या विद्यार्थिनीचं नाव मनशिका प्रसाद. मनशिकाने नुकताच मिस युनिव्हर्स फिजीचा मुकुट जिंकला.पण दोन दिवसानंतर तिला डोक्यावर सजलेला ताज लगेच खालीदेखील उतारावा लागला. या दोन दिवसांनंतर तिचं आयुष्य पूर्ण बदललं. मनशिकाचा ताज का परत घेण्यात आला याचं कारण देखील सांगण्यात आलंय.

मिस युनिव्हर्स फिजी (MUF)संस्थेने मिस फिजी स्पर्धेदरम्यान नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याच निवेदनाद्वारे सांगितले. इव्हेंट मॅनेजरला आर्थिक फायदा होणार असल्याने मनशिकाला जिंकून देण्यात आल्याचा असा दावाही यात करण्यात आला. त्यानंतर सुधारित निकाल जाहीर करत त्यांनी मनशिकाचा मुकुट काढून घेतला गेला.नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत मनशिका फिजीचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही.त्याऐवजी स्पर्धेतील उपविजेत्या ३० वर्षीय नदिन रॉबर्ट्सला मिस युनिव्हर्स फिजी घोषित करण्यात आले.

Miss Universe Fiji Beauty Contest Controversy
Kapil Sharma : फक्त 500 रुपयांची पहिली कमाई, आज 300 कोटींचा मालक; सर्वांना हसवणाऱ्या कपिलचा संघर्ष माहितेय का?

मीडिया रिपोर्टनुसार, सात न्यायाधीशांच्या पॅनलमध्ये मनशिकाने हा सामना 4-3 असा जिंकला. मात्र दुसऱ्याच दिवशी न्यायाधीशांसोबत बोट ट्रिपला गेली. फक्त एका न्यायाधीशांच्या मतावर हा निर्णय देण्यात आला. हे न्यायाधीश लक्स प्रोजेक्ट्स कंपनीची प्रतिनिधी होते. या कंपनीने स्वतः मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनकडून फिजीमध्ये मिस युनिव्हर्सचा किताब मिळवण्याचा परवाना मिळवला होता. यावेळी ७ न्यायाधीशांच्या पॅनेलशिवाय, हे आठवे मतदेखील मोजले जावे, जे स्पर्धेचा (लक्स प्रोजेक्ट्स)परवाना घेतलेल्या व्यक्तीचे आहे. यासोबतच हे मत निर्णायक मानले जाईल, असेही सांगण्यात आले. त्यांनी हे आठवे मत नदिन रॉबर्ट्स यांना दिले.

अशाप्रकारे सामना मनशिका प्रसाद आणि नदिन रॉबर्ट्स यांच्यात 4-4 असा बरोबरीत सुटला, परंतु लक्सच्या निर्णायक मतामुळे नादिनला विजयी घोषित करण्यात आले. लक्स प्रोजेक्ट्सची चौकशी केली असता असे आढळून आले की ही कंपनी ऑस्ट्रेलियन उद्योगपती जेमी मॅकइंटायरची आहे आणि जिमीने नादिन रॉबर्ट्सशी लग्न केले आहे. म्हणजेच, त्यामुळेच नदीनला कोणत्याही मार्गाने विजयी करण्याचा प्रयत्न झाला.

Miss Universe Fiji Beauty Contest Controversy
Radhika Merchant : अंबानींच्या गणपतीची वाजत गाजत मिरवणूक अन् राधिका मर्चंटचा डान्स, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com