Kapil Sharma : फक्त 500 रुपयांची पहिली कमाई, आज 300 कोटींचा मालक; सर्वांना हसवणाऱ्या कपिलचा संघर्ष माहितेय का?

Kapil Sharma Success Story : सर्वांना हसवणाऱ्या कॉमेड किंग कपिल शर्माच्या आयुष्याचा खडतर प्रवास आपण जाणून घेऊयात.
Kapil Sharma Success Story
Kapil SharmaSAAM TV
Published On

कॉमेडीचा किंग अशी ओळख असलेल्या कपिल शर्मा आज आपण जाणून घेणार आहोत. छोट्या पडद्यावरून कपिलने आपले करिअर सुरू केले होते आणि आता तो यशाच्या मोठ्या शिखरावर पोहचला आहे. यामागे त्याची मेहनत, सातत्य आणि लोकांना हसवण्याची कला आहे.

कपिल शर्माने (Kapil Sharma) जगभर लोकांना हसवले आहे. त्यांच्या मानवर राज्य केले आहे. कपिलच्या विनोदाने मानिसक ताण विसरून लोक खळखळून हसत आहेत. मूड फ्रेश करण्यासाठी कपिल शर्मा प्रेक्षक आवर्जून पाहतात. त्यांना खूप कष्टाने आपले नाव या बॉलिवूडमध्ये उंचावर नेऊन ठेवले आहे. आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे. कपिलने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या कॉमेडीची जादू दाखवली आहे. 'कपिल शर्मा शो' या त्याच्या कॉमेडी कार्यक्रमात आपल्याला सेलिब्रिटींची मांदियाळी प्रत्येक वेळी कपिल नव्या सेलिब्रिटीला घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आणि मन मोकळ्या गप्पा मारतो.

सर्वांना हसवणाऱ्या कपिलला स्वतःच्या आयुष्यात खूप अडथळ्यांना सामोरे जावे लागले. कपिल लहान असतानाच त्याचे वडीलांचे निधन झाले. त्याच्याकडे स्वतःच्या बहिणीच्या लग्नासाठी देखील पैसे नव्हते. कपिलने खिशात ५०० रुपये घेऊन आपल्या करिअरला सुरूवात केली. कपिल आज कोटीचा मालक आहे.

कपिल शर्मा स्टॅन्ड अप कॉमेडीसाठी प्रसिद्ध आहे. कॉमेडीच्या दुनियेत कपिलच मोठ नाव आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांने संपूर्ण घराची जबाबदारी घेतली. त्यांनी कॉमेडी क्षेत्रात आपल मोठ नाव कमावल आहे. कपिल पहिल्या कॉमेडी शोच्या ऑडिशनला रिजेक्ट झाला. पण त्याने हार न मानता तो प्रयत्न करत राहीला. पुढे याच शोच्या तिसऱ्या सीजन चा तो विजेता ठरला. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'असे शोचे नाव होते. येथून कपिलच्या खऱ्या प्रवासाला सुरूवात झाली. यानंतर कपिलने कधीच मागे वळून पाहिले नाही.

कॉमेडीच्या जोरावर कपिलने भारत तसेच भारता बाहेर देखील स्वतःची ख्याती निमार्ण केली आहे. कपिलचा जन्म २ एप्रिल १९८१ साली पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांचे वडील हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. त्याच्या वडिलांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. कपिलला वयाच्या वयाच्या २२ वर्षात एवढा मोठा धक्का मिळाला. यामुळे घरचे वातावरण देखील पूर्णपणे बदले. त्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. वडिलांच्या जागेवर पोलीस विभागात त्याला जॉबची ऑफर देखील आली पण कपिलने ती नाकारली. कारण लहानपणापासूनच कपिलला गायनाची आवड होती. त्याला गायक बनायचे होते. पण नंतर त्याने थिएटरला सुरूवात केली. त्याची आई हाऊस वाइफ होती. कपिलला एक मोठा भाऊ आणि मोठी बहीण आहे. कपिल लहानपणापासून खोडकर होता. त्याला लहानपणापासूनच सर्वांना हसवायला जोक्स सांगायाला खूप आवडायचे. तो TV मधील कलाकारांची नक्कल करत असे. कपिलच्या कॉमेडीने जगाला भुरळ घातली आहे.

Kapil Sharma Success Story
Radhika Merchant : अंबानींच्या गणपतीची वाजत गाजत मिरवणूक अन् राधिका मर्चंटचा डान्स, पाहा VIDEO

कमी वयात कपिलने काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याने पीसीओ मध्ये देखील काम केले. तिथे त्याला ५०० रूपये मिळत असे. त्यानंतर दहावी पूर्ण केली आणि कपड्याच्या मिलमध्ये काम केले. तेथे कपिलला ९०० रुपये मिळायचे. या पैशातून त्यांने म्यूजिकल इंस्ट्रूमेंट खरेदी केले. पदवीच शिक्षण घेण्यासाठी खिशात फक्त १२०० रुपये ठेवून तो मुंबईला आला. पण त्याला यश आले नाही त्यामुळे तो पुन्हा अमृतसरला आला. प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट येतो. ज्याने आपले सर्व आयुष्य बदलून जाते. तसाच क्षण कपिलच्या आयुष्यातही आला. त्याच 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'शोसाठी सिलेक्शन झाल. आपल्या विनोदी वृत्तीच्या जोरावर त्यांने या शोचे तिसऱ्या सीजनचे विजेते पदक भूषवले. त्यातून त्याला १० लाख रुपयांचे बक्षिस मिळाले. या पैशातून कपिलने बहिणीचे लग्न केले. येथून त्याच्या आयुष्यात हळूहळू प्रगती व्हायला सुरूवात झाली. कॉमेडी क्षेत्रात त्यांनी मोठी कामगिरी केली. 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' आणि 'द कपिल शर्मा शो' सारख्या शोने कपिलला प्रत्येक घराघरात प्रसिद्ध पोहचवले.

कपिल शर्मा नेटवर्थ

मीडिया रिपोर्ट्सनुसार,कपिलचे नेट वर्थ 330 करोड रुपये आहे. कपिलकडे 1.25 कोटी रुपयांची Volvo XC90 आणि 1 कोटी 20 लाख रुपयांची Mercedes Benz S350 CDI कार आहे. कपिलने 2013 मध्ये रेंज रोव्हर इव्होक 60 लाख रुपयांना खरेदी केले होते. कपिलला स्वतःसाठी खास बनवलेली 5.5 कोटी रुपयांची आलिशान व्हॅनिटी व्हॅन मिळाली आहे. कपिल दरवर्षी 15 कोटी रुपये आयकर भरतो. कपिल मुंबईत ज्या अपार्टमेंटमध्ये राहतो त्याची किंमत 15 कोटी रुपये आहे. पंजाबमधील त्याच्या आलिशान फार्महाऊसची किंमत सुमारे 25 कोटी रुपये आहे. कपिल त्याच्या कॉमेडी शो, लाइव्ह शो, टीव्ही आणि चित्रपट उपक्रम आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून भरपूर कमाई करतो.

Kapil Sharma Success Story
Alia Bhatt : आलिया भट्टच्या ॲक्शनवर कल्कीचे डायरेक्टर फिदा, भरभरून कौतुक करत म्हणाले...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com