Mirzapur The Movie: गुड्डू पंडित आणि कालीन भैय्याचा भौकाल; मिर्झापूरमध्ये पुन्हा रंगणार रक्तरंजीत थरार

Mirzapur The Movie : ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा बहुप्रतीक्षित टीझर रिलीज झाला आहे. गुड्डू पंडित, कालीन भैय्या आणि मुन्ना भैय्याच्या संघर्षाने भरलेला हा टीझर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे.
Mirzapur The Movie
Mirzapur The MovieSaam Tv
Published On

Mirzapur The Movie : ओटीटी विश्वात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘मिर्झापूर’ या वेब सिरिज आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा बहुप्रतीक्षित टीझर अखेर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. चित्रपटात पुन्हा एकदा सत्ता, सूड, रक्तरंजित संघर्ष आणि ‘भौकाल’ यांचे जबरदस्त मिश्रण पाहायला मिळणार आहेत.

टीझरमध्ये कालीन भैय्या, गुड्डू पंडित आणि मुन्ना भैय्या यांची दमदार झलक दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुन्ना भैय्याच्या कमबॅकने चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सत्तेसाठीची लढाई, जुन्या वादाचे नवे रूप आणि मिर्झापूरच्या गादीवर कब्जा मिळवण्यासाठी सुरू असलेला संघर्ष या सर्वांची झलक टीझरमध्ये पाहायला मिळते.

Mirzapur The Movie
Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

चित्रपटात पंकज त्रिपाठी कालीन भैय्याच्या भूमिकेत, अली फजल गुड्डू पंडितच्या भूमिकेत तर दिव्येंदू शर्मा पुन्हा एकदा मुन्ना भैय्या म्हणून दिसणार आहेत. याशिवाय रवि किशन आणि जितेंद्र कुमार, श्रिया पिळगावकर, श्वेता त्रिपाठी यांचीही महत्त्वाची भूमिका असणार असल्याचे समोर आले आहे. टीझरमध्ये रवि किशन यांची दमदार झलक प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

Mirzapur The Movie
Samantha Ruth Prabhu: ३९ व्या वर्षी अभिनेत्री होणार आई, समंथाने चाहत्यांसोबत शेअर केली प्रेग्नन्सीची गोड बातमी

मिर्झापूर’ वेब सीरिजने भारतीय ओटीटी विश्वात वेगळी ओळख निर्माण झाली होती. आता लवकरच या वेब सिरिजचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी यापूर्वी चित्रपटातील प्रमुख पात्रांचे फर्स्ट लूक पोस्टरही प्रदर्शित केले होते. त्यानंतर टीझर रिलीज झाल्याने चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. ‘मिर्झापूर: द मूव्ही’चे दिग्दर्शन गुरमीत सिंह यांनी केले असून हा ४ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com