या सुपरस्टारने मरण्यापूर्वी मुलांच्या नावावर केले २४४ कोटी, निधनानंतर ७० दिवसांनी झाला अंत्यविधी

Michael Jackson : हा एक असा स्टार होता ज्याने त्याच्या मृत्यूनंतर अब्जावधी रुपये कमावले आणि मरण्यापूर्वी त्याने त्याच्या प्रत्येक मुलांसाठी २४४ कोटी रुपये ठेवले होते. त्याला १५० वर्षे जगायचे होते म्हणून तो ऑक्सिजन चेंबरमध्ये झोपायचा.
Michael Jackson
Michael JacksonSaam Tv
Published On

Michael Jackson : जगात असा पॉप स्टार क्वचितच झाला असेल, ज्याच्या मृत्युवर संपूर्ण जगाने अश्रू ढाळले असतील आणि त्याच्या अंत्ययात्रेत सामील होण्यासाठी लकी तिकिटे काढण्यात आली असतील. त्याची अंतयात्रा जगभरातील 300 कोटी लोकांनी पाहिला. इतकेच नाही तर त्याच्या मृत्युनंतर 70 दिवसांनी त्याला पुरण्यात आला आणि तेही एका गूढ पद्धतीने. आणि या पॉप स्टारने त्याच्या मृत्युनंतर अनेक विक्रम केले. त्याच्या नावावर एक-दोन नाही तर 39 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. असे म्हटले जाते की त्याच्या मृत्युनंतर या पॉप स्टारने 17,110 कोटी रुपये कमावले. त्याने त्याच्या प्रत्येक मुलांच्या नावावर 244 कोटी रुपये ठेवले. या स्टारला 150 वर्षे जगायचे होते, म्हणून त्याने 12 डॉक्टर ठेवले. पण, त्याचा मृतदेह गूढ पद्धतीने दफन करण्यात आला.

या पॉप स्टारचे निधन 16 वर्षांपूर्वी झाले, परंतु त्याची गाणी अजूनही ऐकली जातात आणि चाहते त्याला अजूनही आठवतात. १५० वर्षे जगण्याच्या इच्छेने तो ऑक्सिजन चेंबरमध्ये झोपायचा, पण वयाच्या ५० व्या वर्षी मृत्यूने त्याला आपल्या मिठीत घेतले. हा स्टार दुसरा कोणी नसून जगप्रसिद्ध पॉप स्टार मायकल जॅक्सन आहे.

Michael Jackson
Bigg Boss 19: बिग बॉस १९चा विनर आधीच ठरला?; घरात झालेल्या भांडणामध्ये 'या' स्पर्धकाने सगळं सांगितलं

मायकल जॅक्सनला जग 'किंग ऑफ पॉप' म्हणून ओळखतात. २९ ऑगस्ट हा त्यांचा ६७ वा वाढदिवस आहे. तो जगातील सर्वोत्तम गायक होता. त्याच्या आवाजाव्यतिरिक्त, तो त्याच्या गाण्यांसाठी, डान्स आणि मून वॉकसाठी प्रसिद्ध होते. लाखो लोकांनी मायकलची मूव्ह वॉक स्टाईल शिकली आणि आजपर्यंत त्यांची कॉपी केली. २५ जून २००९ रोजी मायकल जॅक्सनचा मृत्यू झाला. असे म्हटले जाते की ही बातमी ऐकल्यानंतर अनेक लोक रस्त्यावर बेशुद्ध पडले, तर त्याच्या १३ चाहत्यांनी आत्महत्या केली.

Michael Jackson
Box Office Report: गुरुवारी 'महावतार नरसिंह'ने मारली बाजी; पण, 'कुली' आणि 'वॉर २'ची जादू फेल

मृत्यूनंतर ७० दिवसांनी सोन्याच्या शवपेटीत पुरले

मायकल जॅक्सनचा मृतदेह सोन्याच्या शवपेटीत पुरण्यात आला. सुरुवातीला त्याच्या कुटुंबातील सदस्यांना याबद्दल भीती होती. त्यांना भीती होती की त्याचा मृतदेह आणि शवपेटी चोरीला जाऊ शकते. म्हणून, प्रथम मायकल जॅक्सनचा मृतदेह मेकअप आर्टिस्टने सजवला आणि नंतर तो सोन्याच्या शवपेटीत ठेवून काँक्रीटमध्ये पुरण्यात आला. मायकल जॅक्सनचा मृतदेह कुठे पुरला गेला हे गुप्त ठेवण्यात आले. परंतु नंतर तो बाहेर काढून फॉरेस्ट लॉनमध्ये असलेल्या ग्रेट मायसेलियममध्ये पुरण्यात आला.

२८.४० अब्ज रुपये कमावले

'फोर्ब्स'च्या अहवालानुसार, मायकल जॅक्सनने त्याच्या मृत्यूनंतर १७,११० कोटी रुपये कमावले. त्याच्या मृत्यूनंतर १० वर्षेही तो सर्वाधिक कमाई करणारा गायक राहिला. अहवालानुसार, मायकल जॅक्सनने २०१८ पर्यंत २८.४० अब्ज रुपये कमावले होते. असे म्हटले जाते की त्याच्या मृत्यूपूर्वी त्याने त्याच्या प्रत्येक मुलासाठी त्याच्या मालमत्तेतून २४४ कोटी रुपये ठेवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com