Mia Khalifa Divorce: एका वर्षातच मोडलं मिया खलिफाचं दुसरं लग्न; प्रतिक्रिया देत म्हणते, माझा नवरा....

लग्नाच्या एका वर्षांनंतर मिया खलिफा आणि पती रॉबर्ट सँडबर्ग यांनी एकमेकांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे.
Adult Star Mia Khalifa Divorce News
Adult Star Mia Khalifa Divorce NewsSaam Tv
Published On

Adult Star Mia Khalifa Divorce News: ॲडल्ट फिल्म स्टार मिया खलिफा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. लग्नाच्या एका वर्षांनंतर मिया खलिफा आणि पती रॉबर्ट सँडबर्ग यांनी एकमेकांना घटस्फोट दिला आहे. मिया खलिफा आणि रॉबर्ट सँडबर्ग जोडप्याने का घटस्फोटाचा निर्णय घेतला. मिया आता कोणाला डेट करत आहे? याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. 

मिया खलिफाने नुकतेच पतीपासून वेगळे होण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ॲडल्ट फिल्म स्टार मिया खलिफाने २१ जुलै २०२१ रोजी पती रॉबर्ट सँडबर्गसोबत लग्नाची घोषणा केली आणि एका वर्षातच तिने घटस्फोट घेतल्याचेही स्पष्ट केले. त्यांनी विभक्त होण्याचे कारण 'एकमेकांतील मतभेद' असल्याचे सांगितले. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिया आणि रॉबर्ट यांनी २०२० मध्ये त्यांच्या घरी लग्न केले आणि त्यांनी अलीकडेच त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला.

Adult Star Mia Khalifa Divorce News
सपनाची The Kapil Sharma Showमध्ये रिएन्ट्री; कृष्णा अभिषेकचा सेटवरील व्हिडिओ व्हायरल

मियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, रॉबर्ट सँडबर्गसबोत घटस्फोट झाल्याची माहिती दिली. मिया पोस्टमध्ये म्हणते, ‘आम्ही आत्मविश्वासाने म्हणू शकतो की आमचं लग्न यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व काही केलं. पण जवळपास एक वर्ष प्रयत्न केल्यानंतर आमचे मार्ग वेगळे होत आहेत.’

पुढे मिया म्हणते, ‘नातं तुटलं असलं तरी, आम्ही चांगले मित्र आहोत. दोघांनी देखील लग्न टीकवण्याचा प्रयत्न केला, काही मतभेद आहे, जे दूर होऊ शकले नाहीत. म्हणून आम्ही विभक्त होत आहोत. ज्यासाठी दोघंही एकमेकांना दोष देऊ शकत नाही.’ असं म्हणत तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत पोस्ट शेअर केली. सध्या मिया खलिफाच्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगत आहे. (Hollywood)

ॲडल्ट फिल्म स्टार मिया खलिफाचे यापूर्वी २०११ ते २०१४ दरम्यान लग्न झाले होते, जे तीन वर्षे टिकले होते. तिच्या पोर्नोग्राफिक कारकीर्दीच्या सुरुवातीला हायस्कूलमध्ये लग्न केल्याची अफवा पसरली असली तरी तिचा पुर्वाश्रमीच्या पतीची कोठेही माहिती नाही. सँडबर्गने तिला मार्च २०२० मध्ये प्रपोज केला होता. नंतर दोघांनी २०२१ मध्ये लग्न केले. २८ वर्षीय सँडबर्ग हा हॉटेलमध्ये शेफ असून तो सॉस एंजेलिसमध्ये मिया आणि त्यांचा कुत्रा, बेलासोबत राहत होता.

Adult Star Mia Khalifa Divorce News
Kiran Mane Reject Maharashtra Shaheer Film: किरण मानेंनी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाला ‘या’ कारणामुळे दिला नकार; पोस्ट चर्चेत...

२०२१ मध्ये मिया आणि 'प्वेर्तो रिकन' कलाकार झाय कॉर्टेझसोबत डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या, जेव्हा ते दोघे YouTube वर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये एकत्र दिसले. तेव्हापासून हे दोघे एकत्र असल्याची चर्चा रंगली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com