Krushna Abhishek in Kapil Sharma Show: 'द कपिल शर्मा शो' हा हिंदी टीव्ही विश्वातील एक सुप्रसिद्ध कार्यक्रम आहे. २०१६ पासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील पात्र विविध भूमिका साकारत आपलं मनोरंजन करतात. या शोमधील अनेक कलाकार शो सोडून गेले आहेत. तर काही पुन्हा शोमध्ये परत आले आहेत. या कलाकाराच्या येण्याने शोच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.
'द कपिल शर्मा शो'पासून दूर असलेला कृष्णा अभिषेक शोमध्ये परतला आहे. संपूर्ण सीझनमध्ये प्रेक्षक सपना दीदींला मिस करत होते. तर खूप महिन्यांनी कृष्णाने शोमध्ये धमाकेदार पुनरागमन केले आहे आणि शूटिंग सेटवरील एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
कृष्णा अभिषेक 'द कपिल शर्मा शो' सोडून गेल्याने प्रेक्षक निराश झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून कृष्णा निर्मात्यांशी त्याच्या मानधनाविषयी चर्चा करत असल्याच्या बातम्या कानावर येत होत्या. त्यामुळे त्याचे शोमध्ये परतणे जवळपास अशक्य आहे, असे अनेकांना वाटत होते.
द कपिल शर्मा शोच्या सेटवरून कृष्णाने शेअर केलेल्या व्हिडिओने प्रेक्षकांना आनंद झाला आहे. कॉमेडियनचा हा व्हिडिओ त्याने शेअर करताच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये कृष्णा सपना दीदीच्या लूकमध्ये दिसत आहे. कृष्णाने आपल्या जुन्या शैलीत सेटवर प्रवेश करताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले. किकू शारदासह त्याच्या सहकलाकारांनीही स्टेजवर कृष्णाचे स्वागत केले. (Latest Entertainment News)
द कपिल शर्मा शोचा हा लेटेस्ट व्हिडिओ कृष्णा अभिषेकने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने शोमध्ये परतल्याची माहिती दिली. कॉमेडियनने लिहिले, "सपना परत आली आहे. माझ्यावर खूप प्रेम केल्याबद्दल माझ्या चाहत्यांचे आभार. लव्ह यू कपिल शर्मा, अर्चना पूरण सिंग, किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती. परत आल्यावर खूप आनंद झाला. विलक्षण मजेदार वीकेंड."
कृष्णा अभिषेक अनेक वर्षांपासून द कपिल शर्मा शो सोबत जोडला गेला आहे. गेल्या वर्षी तो शोच्या टीमसोबत वर्ल्ड टूरवरही गेला होता, पण परत आल्यानंतर तो कपिल शर्मा शोच्या नवीन सीझनमध्ये दिसला नाही.
यामागे आर्थिक कारण असल्याचे सांगत यावरून निर्मात्यांशी झालेल्या भांडण झाल्याचे कृष्णाने सांगितले होते. कृष्णाला त्याच्या मानधनात वाढ हवी होती, पण निर्मात्यांसोबत करार होऊ शकला नव्हता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.