New Serial: 'जोडायचं ठरवलं तर सगळं जोडता येतं...'; 'मी संसार माझा रेखिते' छोट्या पडद्यावर लवकरच सुरु होणार नवी मालिका

Me Sansar Majha Rekhite: मराठी टेलिव्हिजन विश्वात आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘मी संसार माझा रेखिते’ असे या मालिकेचे शीर्षक आहे.
Me Sansar Majha Rekhite
Me Sansar Majha RekhiteSaam Tv
Published On
Summary

मराठी टेलिव्हिजन विश्वात लवकरच नवी मालिका

'मी संसार माझा रेखिते' मालिकेचे शीर्षक

१ डिसेंबरपासून सन मराठीवर प्रसारित

Me Sansar Majha Rekhite: मराठी टेलिव्हिजन विश्वात आणखी एक नवी आणि हळवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘मी संसार माझा रेखिते’ असे या मालिकेचे शीर्षक असून ही मालिका सन मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री दिप्ती केतकर प्रमुख भूमिकेत दिसणार असून, तिच्यासोबत अभिनेता हरीश दुधाडेही झळकणार आहे.

मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. प्रोमोमध्ये दिप्ती केतकर एका समर्पित, मेहनती आणि कुटुंबासाठी जगणाऱ्या स्त्रीची भूमिका साकारताना दिसते. तिच्या चेहऱ्यावर शांतता असली तरी तिच्या अंतर्मनात असलेली भावनिक वेदना आणि आपुलकीच्या शोधाची भावना स्पष्टपणे जाणवते. मालिकेची कथा अशा स्त्रीभोवती फिरते जी संसाराचा गाडा ओढताना स्वतःच्या भावना, स्वप्नं आणि ओळख विसरत चालली आहे.

Me Sansar Majha Rekhite
Raja Shivaji: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार संजू-सलमानची जोडी; साकारणार 'ही' खास भूमिका

या मालिकेत हरीश दुधाडे महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. त्याच्यासोबत रोहिणी निनावे, प्रणिता आचरेकर, संजीवनी जाधव, आभा बोडस, आणि दिप्ती सोनावणे असे अनुभवी कलाकारही झळकणार आहेत. या सर्व कलाकारांचा अभिनय आणि त्यांच्या नातेसंबंधांचा गुंता मालिकेला अधिक वास्तववादी रूप देतो.

Me Sansar Majha Rekhite
Actress Hospitalised: डिव्होर्सच्या चर्चेदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; 'या' आजारामुळे केलं रुग्णालयात दाखल

“जोडायचं ठरवलं तर सगळं जोडता येतं.” अशी मालिकेची मुख्य संकल्पना आहे. ‘मी संसार माझा रेखिते’ ही मालिका १ डिसेंबरपासून रात्री ९:३० वाजता सन मराठीवर प्रसारित होणार आहे. ही मालिका आधुनिक स्त्रीचा संघर्ष, तिचा आत्मविश्वास आणि प्रेमाच्या शोधावर भाष्य करणारी ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com