'120 बहादूर' आणि 'मस्ती 4' चित्रपट 21 नोव्हेंबरला रिलीज झाले आहेत.
'दे दे प्यार दे 2' सिनेमा 14 नोव्हेंबर 2025 ला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
'120 बहादूर' आणि 'मस्ती 4' चित्रपट एकमेकांना तगडी टक्कर देत आहेत.
सध्या बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना चित्रपटांची मेजवानी पाहायला मिळत आहे. थिएटरमध्ये '120 बहादूर', 'मस्ती 4' आणि 'दे दे प्यार दे 2' चित्रपट धुमाकूळ घालत आहेत. '120 बहादूर' आणि 'मस्ती 4' चित्रपट 21 नोव्हेंबरला रिलीज झाले आहे. चित्रपटांनी रविवारी किती कोटींचा गल्ला जमावला, जाणून घेऊयात.
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरचा '120 बहादूर' चित्रपट रितेश देशमुखच्या 'मस्ती 4'ला तगडी टक्कर देत आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार, पहिल्या रविवारी चित्रपटाने 4.00 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. एकूण तीन दिवसात सिनेमाने 10.10 कोटी रुपये कमावले. '120 बहादूर' मधून एका सैनिकाची कथा सांगण्यात आली आहे. चित्रपटात फरहान अख्तर मेजर शहीद सिंहच्या भूमिकेत आहे. राशी खन्नाने शहीद सिंहची पत्नी शगुन कंवरची भूमिका साकारली आहे.
दिवस पहिला - 2.25 कोटी रुपये
दिवस दुसरा - 3.85 कोटी रुपये
दिवस तिसरा - 4.00 कोटी रुपये
एकूण - 10.10 कोटी रुपये
'मस्ती 4' हा चित्रपट कॉमेडी ड्रामा आहे. 'मस्ती 4' हा 'मस्ती' फ्रेंचायझीचा चौथा भाग आहे. या चित्रपटात प्रसिद्ध कलाकार पाहायला मिळत आहेत. यात रितेश देशमुखसोबत विवेक ओबेरॉय, अरशद वारसी, आफताब शिवदासानी, तुषार कपूर, नरगिस फाखरी, एलनाज नौरोजी , श्रेया शर्मा हे झळकले आहेत. Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार, 'मस्ती 4' चित्रपटाने पहिल्या रविवारी 3.00 कोटी रुपये कमावले आहे. चित्रपटीचे एकूण कलेक्शन 8.50 कोटी रुपये झाले आहे. 'मस्ती 4' चित्रपट मिलाप झावेरी यांनी दिग्दर्शित केला आहे.
दिवस पहिला - 2.75 कोटी रुपये
दिवस दुसरा - 2.75 कोटी रुपये
दिवस तिसरा - 3.00 कोटी रुपये
एकूण - 8.50 कोटी रुपये
'दे दे प्यार दे 2' सिनेमा 14 नोव्हेंबर 2025 ला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपट रिलीज होऊन दोन आठवडे झाले आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 51.1 कोटींची कमाई केली आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार, चित्रपटाने दुसऱ्या रविवारी तब्बल 4.50 कोटी रुपये कमावले आहे. चित्रपटने आतापर्यंत एकूण 61.85 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. 'दे दे प्यार दे 2' हा अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंहचा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे.
दिवस पहिला - 8.75 कोटी रुपये
दिवस दुसरा - 12.25 कोटी रुपये
दिवस तिसरा - 13.75 कोटी रुपये
दिवस चौथा - 4.25 कोटी रुपये
दिवस पाचवा - 5.25 कोटी रुपये
दिवस सहावा - 3.5 कोटी रुपये
दिवस सातवा - 3.35 कोटी रुपये
दिवस आठवा - 2.25 कोटी रुपये
दिवस नववा - 4 कोटी रुपये
दिवस दहावा - 4.50 कोटी रुपये
एकूण - 61.85 कोटी रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.