TRP Rating Of Marathi Serial: ‘ठरलं तर मग’ला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती, ‘आई कुठे काय करते’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’लाही टाकलं मागे

TRP Rating News: २३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबरपर्यंतचा टीआरपीचा रिपोर्ट समोर आला आहे.
Marathi Serial TRP Rating News
Marathi Serial TRP Rating NewsSaam Tv

Marathi Serial TRP Rating News

टेलिव्हिजन सिरीयल चॅनेलचा लेटेस्ट TRP रिपोर्ट जाहीर झाला आहे. नुकताच ३९ व्या आठवड्याचा TRP रिपोर्ट जाहीर झाला आहे. हा रिपोर्ट एका मनोरंजन इन्स्टाग्राम पेजने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. टीआरपीच्या खेळामध्ये पुन्हा एकदा ‘ठरलं तर मग’ या मालिकेने बाजी मारली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ‘तुझेच मी गीत गात आहे’या मालिकेने बाजी मारली आहे.

Marathi Serial TRP Rating News
Nushrratt Bharuccha: इस्राइलमध्ये अडकलेली नुसरत भरुचा अखेर भारतात परतली

‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली होती. ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत नेहमीच नंबर एकवर राहिली आहे. प्रदर्शित झाल्यापासून अनेक सिरियल्सला मागे सारत, या मालिकेने टीआरपीमध्ये पहिल्या नंबरवर स्वत:चे नाव कोरलेय. मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत जुई गडकरी आणि अमित भानुशाली असून पती-पत्नीची एक वेगळीच लव्ह स्टोरी प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे.

Marathi Serial TRP Rating News
Prasad And Amruta News: ‘जावई असावा तर असा...’ लेक सासरी जाण्याआधीच अमृताच्या आईची भावनिक पोस्ट; प्रसाद कमेंट करत म्हणाला...

स्वरा आणि मल्हारच्या आयुष्यात आलेल्या ट्वीस्टमुळे ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका रंजक वळणावर असल्याचे दिसते. मालिकेने टीआरपी शर्यतीत दुसरा क्रमांक पटकावला असून मालिकेचा चाहतावर्ग वाढतच चालला आहे. कायमच टीआरपीमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा सुद्धा टीआरपी घसरलेला पाहायला मिळत आहे. त्या सोबतच  ‘प्रेमाची गोष्ट’  या मालिकेलाही फार कमी टीआरपी मिळाला आहे. या आठवड्यात अनेक मालिकेंचा टीआरपीचा रेट घसरलेला पाहायला मिळत आहे.

टॉप १५ मध्ये सर्वच स्टार प्रवाहवरील मालिका आपल्याला पाहायला मिळत आहे. फक्त १४ व्या क्रमांकावर झी मराठीवरील ‘तुला शिकविनच चांगला धडा’ही मालिका पाहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचा चाहतावर्ग वाढत चालला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अधिपती आणि अक्षराचे लग्न झाले. यांच्या लग्नानंतर मालिकेला एक वेगळाच ट्रॅक मिळाला आहे. त्यांच्या लग्नाची चर्चा होत असल्यापासून मालिका फारच रंजक वळणावर गेली होती.

Marathi Serial TRP Rating News
Karan Patel On Bollywood: गटबाजी नसेल तर निम्म्या कलाकारांचं दुकान बंद होईल; बॉलिवूडवर भडकला TV अ‍ॅक्टर करण पटेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com