Lagnanantar Hoilach Prem: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ सध्या प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या भावनिक वळणावर पोहोचली आहे. जीवा आणि नंदिनी यांच्या आयुष्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे कथानक अधिकच उत्साह वाढला आहे. एका बाजूला काव्या आणि पार्थ यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागलेली असताना, दुसऱ्या बाजूला नंदिनी मात्र मातृत्वाच्या अपूर्ण स्वप्नामुळे मानसिक तणावाचा सामना करत आहे.
आई होण्याची तीव्र इच्छा मनात बाळगून नंदिनी अनेक प्रयत्न करत असते. मात्र प्रत्येक वेळी तिच्या पदरी निराशाच पडल्याने तिचा आणि जीव्याचा प्रवास अधिक भावनिक झाला आहे. अखेर वैद्यकीय सल्ल्यानुसार जीवा आणि नंदिनी यांनी सरोगसीचा मार्ग स्वीकारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या आयुष्यातील या नव्या प्रवासात त्यांना साथ देण्यासाठी मालिकेत एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेची एण्ट्री होणार आहे.
लोकप्रिय अभिनेत्री अनघा अतुल आता ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत डॉ. आर्या या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या आगमनामुळे जीवा आणि नंदिनी यांच्या आयुष्यात अनेक महत्त्वाचे बदल घडणार असून कथानकाला नवे वळण मिळणार आहे. सकारात्मक विचारसरणी असलेली डॉ. आर्या ही व्यक्तिरेखा त्यांच्या सरोगसीच्या प्रवासात त्यांना खास मदत करणार आहे.
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील श्वेता या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अनघा अतुल जवळपास तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या कुटुंबात परतत आहे. या नव्या भूमिकेबद्दल बोलताना तिने आनंद व्यक्त केला. अनघाने सांगितले की, ‘स्टार प्रवाहसोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. डॉ. आर्या ही अतिशय समजूतदार, संवेदनशील आणि सकारात्मक व्यक्तिरेखा आहे. जीवा आणि नंदिनी यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर ती त्यांच्या सोबत उभी राहणार आहे. या भूमिकेत भावनांची सुंदर गुंफण आहे आणि प्रेक्षकांनाही ती नक्की आवडेल, अशी मला आशा आहे.’
आता जीवा आणि नंदिनी यांचे मातृत्वाचे स्वप्न पूर्ण होणार का? डॉ. आर्याच्या आगमनामुळे त्यांच्या आयुष्यात नेमके कोणते बदल घडणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आगामी भागांमध्ये मिळणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.