Indrayani-Pinga Ga Pori Pinga Sunday Special Episode
Marathi Serial UpdateSAAM TV

Marathi Serial Update : रविवारी होणार मनोरंजनाचा डबल धमाका; 'इंद्रायणी' अन् 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकांचे विशेष एपिसोड, पाहा VIDEO

Indrayani-Pinga Ga Pori Pinga Sunday Special Episode : 'इंद्रायणी' आणि 'पिंगा गं पोरी पिंगा' या दोन्ही मालिकांचे रविवारी विशेष भाग पाहायला मिळणार आहे. मालिकांचे अपडेट जाणून घेऊयात.
Published on

'इंद्रायणी' (Indrayani) आणि 'पिंगा गं पोरी पिंगा' (Pinga Ga Pori Pinga) या दोन्ही मालिकांमध्ये सध्या महत्त्वाचे वळण पाहायला मिळत आहे. या दोन्ही मालिकांचा विशेष भाग येत्या रविवारी म्हणजेच 27 एप्रिलला प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. 'इंद्रायणी' मध्ये इंदूची समाज बदलण्याची ठाम भूमिका आणि शिक्षणासाठी घेतलेली धडपड, ध्यास बघायला मिळणार आहे. 'इंद्रायणी' मालिकेच्या विशेष भागात इंदू एक स्पष्ट, ठाम भूमिका घेताना दिसणार आहे.

'इंद्रायणी' मालिकेत कीर्तन विठूच्या वाडीतील मंदिरातच होणार असे इंदू मोहितरावला बजावून सांगताना दिसणार आहे. तिच्या कीर्तनातून ती समाजात परिवर्तन घडवण्यासाठी सजग नागरिक म्हणून जबाबदारीने मतदान करण्याचा संदेश देते. ती ठाम सांगते की, "जर मोहितराव सारख्या स्वार्थी लोकांना निवडून आणले तर समाजाची प्रगती होणार नाही. उलट समाजव्यवस्थेला धोका निर्माण होईल. " शिक्षणाच्या अभावावर ती बोट ठेवते गावात शाळा नसेल तर प्रगती होणार कशी? गावातील मुलांना शिक्षणासाठी लांब जावं लागते.

मोहितराव कार्यकर्ते इंदूवर आरोप करतात आणि तिच्यावर दबाव आणतात. पण इंद्रायणी त्यांना सडेतोड उत्तर देते आणि मोहितरावांच्या आव्हानाला स्वीकारते. "पुढच्या एका वर्षात मी विठूच्या वाडीत शाळा सुरू करून दाखवेन!" असे इंदू वचन देते. इंदू आता हे वचन कसे पूर्ण करणार पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

दुसरीकडे 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत तिघी मैत्रिणी वल्लरी, तेजा आणि प्रेरणा मनोजसह हॉस्पिटलमध्ये दाखल होतात.मिठूच्या प्रकृतीची चिंता सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. डॉक्टर सांगतात की, "मिठूने डोळे उघडले आहेत आणि आता ती धोक्याच्या बाहेर आहे." हा दिलासा मिळताच सर्वजण सुटकेचा नि:श्वास टाकतात. मात्र मिठूच्या वडिलांचा निर्णय सगळ्यांना हादरवतो ते तिला साताऱ्याला घेऊन जाण्याचा हट्ट धरतात.

मिठूच्या वडिलांच्या मते, मुलींसोबत राहणं सुरक्षित नाही. डॉक्टर त्यांना समजावतात मिठूच्या वयामुळे आणि मैत्रिणींच्या सहवासामुळे तिची रीकव्हरी लवकर होईल. तिच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण ज्या घरात आहेत तिथेच राहणं तिच्यासाठी लाभदायक ठरेल. हे ऐकताच तिघी मैत्रिणी खुश होतात, पण पुढे काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. मिठूच्या परत येण्याने पिंगा गर्ल्सच्या चेहऱ्यावर हसू पुन्हा एकदा फुलले आहे.

'इंद्रायणी' मालिका दुपारी 1 आणि संध्याकाळी 7 वाजता तर 'पिंगा गं पोरी पिंगा' ही मालिका दुपारी 2 आणि रात्री 8 वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार आहे. विशेष भागांमध्ये एका बाजूला समाजप्रबोधनाचा आवाज घुमणार आहे तर दुसऱ्या बाजूला मैत्री, भावना आणि कुटुंबातील संघर्ष बघायला मिळणार आहे.

Indrayani-Pinga Ga Pori Pinga Sunday Special Episode
Ankita Walawalkar : डार्लिंग नवऱ्या! 'कोकण हार्टेड गर्ल'नं झापुक झुपूक स्टाइलमध्ये दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com