Khashaba Jadhav Biopic: चांगभलं! नागराज मंजुळेच्या 'खाशाबा'च्या शूटिंगला सुरूवात, म्हणतो...

Khashaba Movie Shooting Started: 'खाशाबा' हा चित्रपट भारताचे दिवंगत कुस्तीपटू खशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित आहे. आता या चित्रपटाच्या शूटिंगला आजपासून सुरूवात झाली आहे.
Khashaba Movie Shooting
Khashaba Movie Shooting Saam Tv
Published On

Nagraj Manjule Khashaba Movie:

जिओ स्टुडिओज आणि आटपाट निर्मित आगामी मराठी चित्रपट 'खाशाबा' चित्रपटाच्या (Khashaba Movie) शूटिंगला आजपासून सुरूवात झाली. मराठी सिनेसृष्टीचे प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) हा या बायोपिकचे दिग्दर्शन करत आहेत. नागराज मंजुळेनेच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाल्याची माहिती दिली.

'फँड्री', 'सैराट', 'नाळ', 'झुंड', 'घर बंदूक बिरयाणी' आणि 'नाळ २'चित्रपटाच्या यशानंतर आता नागराज मंजुळे प्रेक्षकांसाठी आणखी एक नवा चित्रपट घेऊन आला आहे. या चित्रपटाचे नाव आहे खाशाबा. काही महिन्यांपूर्वी नागराज मंजुळेने या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट भारताचे दिवंगत कुस्तीपटू खशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित आहे. आता या चित्रपटाच्या शूटिंगला आजपासून सुरूवात झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'खाशाबा' या चित्रपटात भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक विजेत्या खाशाबा जाधव यांची न ऐकलेली कहाणी पहायला मिळणार आहे. नागराज मंजुळेने आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर खाशाबाच्या शूटिंगला सुरूवात झाल्याचा फोटो पोस्ट केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत त्याने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. हा फोटो पोस्ट करत त्याने 'चांगभलं' असं कॅप्शन दिले आहे.

१९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचे ऐतिहासिक पदक जिंकणाऱ्या आणि स्वतंत्र भारतामध्ये वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे पहिले भारतीय कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात येणार आहे. मराठी मातीतील विस्मृतीत गेलेल्या एका झुंजार नायकाचा असाधारण जीवनप्रवास खाशाबा चित्रपटाच्या निमित्ताने मांडला जाणार आहे.

Khashaba Movie Shooting
Dunki Drop 3 New Song: 'डंकी'मधील 'निकले थे कभी हम घर से' गाणं रिलीज, शाहरुख-तापसीला रडताना पाहून चाहते इमोशनल

चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाल्यानंतर नागराज मंजुळेने सांगितले की, ‘सैराटनंतर हा माझा तिसरा मराठी चित्रपट आहे. जिओ स्टुडिओज सोबत या महत्वाकांक्षी निर्मितीसाठी आम्ही सज्ज आहोत. मागच्या तीन वर्षांपासून आम्ही 'खाशाबा'ची तयारी करत आहोत. आज चित्रीकरण सुरू होत आहे याचा मला आनंद आहे.’ जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, गार्गी कुलकर्णी आणि आटपाट निर्मित, नागराज पोपटराव मंजुळेद्वारा दिग्दर्शित ‘खाशाबा’ २०२५ मध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Khashaba Movie Shooting
Katrina Kaif Watch Sam Bahadur: ‘संपूर्ण चित्रपटामध्ये तू कुठेच दिसला नाहीस...’; पती विकी कौशलचा ‘सॅम बहादुर’ पाहून कतरिना कैफ असं का म्हणाली?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com