Fakat Film Lead Actors: ‘फकाट’मध्ये दिसणार युवा कलाकारांची दमदार फळी; पोस्टर पाहून चित्रपटाची उत्सुकता शिगेला

दमदार कलाकारांची फळी असलेला हा एक अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे.
Fakat Marathi Film Lead Actors
Fakat Marathi Film Lead ActorsSaam Tv

Fakat Marathi Film Lead Actors: प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी हायली कॉन्फिडेन्शियल गोष्ट हमखास घडतेच, नेमकी जर तिच गोष्ट कोणाच्या हाती लागली तर? या गोष्टीचा विचार न केलेलाच बरा... याच भन्नाट विषयावर आधारित एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘फकाट’ असे हटके नाव असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रेयश जाधव असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून येत्या १९ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Fakat Marathi Film Lead Actors
Virat Kohli Debut In Film Industry: KRK च्या गाजलेल्या देशद्रोही चा पुढचा भाग लवकरच.. क्रिकेटपटू विराट कोहलीला KRK ने दिली अभिनयाची ऑफर

पोस्टरमध्ये हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, कबीर दुहान सिंग, अनुजा साठे, रसिका सुनील, नितीश चव्हाण, किरण गायकवाड आणि महेश जाधव हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहे. दमदार कलाकारांची फळी असलेला हा एक अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे. (Latest Marathi News)

पोस्टरमध्ये चित्रपटातील सगळे कलाकार दिसत असून एलओसी सिक्रेटची फाईल दिसत आहे आणि आजूबाजूला पैसेही दिसत आहेत. त्यामुळे आता हा नेमका काय प्रकार आहे? काय रहस्य आहे, याचे उत्तर चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच मिळेल.

दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, “प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा हा एक धमाल कौटुंबिक चित्रपट आहे. यात कॉमेडी आहे, अ‍ॅक्शन आहे. सोबतच चित्रपटात हायली कॉन्फिडेन्शियल धिंगाणा आहे. चित्रपटातील सगळेच कलाकार भन्नाट आहेत. प्रत्येकाने आपल्याला व्यक्तिरेखेला शंभर टक्के न्याय दिला आहे.” (Bollywood News)

वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com