Hi Anokhi Gaath Trailer: श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवलेच्या 'ही अनोखी गाठ…'चा ट्रेलर रिलीज

Hi Anokhi Gaath Trailer Out: महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Hi Anokhi Gaath Trailer Released
Hi Anokhi Gaath Trailer ReleasedSaam Tv

Hi Anokhi Gaath Trailer Released

गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. 'वेलकम ३'च्या शूटिंगवरून घरी परतत असताना अभिनेत्याला अचानकच हृदयविकाराचा झटका आला. यातून तो आता पूर्णपणे बरा झाला असून तो पुन्हा कामावर रुजू झाला आहे. अशातच अभिनेता श्रेयस तळपदे सध्या ‘ही अनोखी गाठ’ या मराठी चित्रपटामुळे कमालीचा चर्चेत आला आहे. श्रेयस तळपदे लवकरच महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Hi Anokhi Gaath Trailer Released
हे काय पाहावं लागतंय?, पॉर्न स्टारसोबत जाहिरात करणं Ranveer Singh ला पडलं महागात; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या शेअर करण्यात आलेल्या ह्या ट्रेलरमध्ये, वडील आणि मुलगीच्या नात्यातील कथा दाखवली आहे. ट्रेलरमध्ये वडीलांनी मुलीच्या लग्नाचा थाट कशा प्रकारे रचला हे पाहायला मिळत आहे. वडीलांनी मनाविरोधात करुन दिलेलं लग्न, प्रत्येक गोष्टीला करावा लागणारा विरोध आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला मिळत आहे. ही नवी अनोखी गाठ प्रेक्षकांना फारच भावलेली दिसत आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांचे असून यात श्रेयश तळपदे, गौरी इंगवले, ऋषी सक्सेना, शरद पोंक्षे, सुहास जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

'ही अनोखी गाठ' या चित्रपटाच्या निमित्ताने महेश मांजरेकर आणि श्रेयस तळपदे ही जोडी पहिल्यांदा एकत्र काम करणार आहे. हा चित्रपट येत्या १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाबद्दल महेश मांजरेकर म्हणतात, "नात्याची एक अनोखी गोष्ट प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रेयससोबत प्रथमच काम करतोय. त्याचा अभिनय मी पाहिला आहे. तो अतिशय हुशार अभिनेता आहे. एक कलाकार म्हणून स्वतःला नेहमीच समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक व्यक्तिरेखेला तो शंभर टक्के न्याय देतो. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव कमाल होता. या चित्रपटात ऋषीचीही भूमिका आहे. 'ही अनोखी गाठ'च्या निमित्ताने गौरीला पुन्हा एकदा तिचे नृत्यकौशल्य सादर करण्याची संधी मिळाली आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात अनेक नावाजलेले कलाकार आहेत. खूप साधी, सरळ तरीही अनोखी अशी ही प्रेमकहाणी आहे. झी स्टुडिओजसोबत याआधी बरेच चित्रपट केले आहेत, त्यामुळे त्य्नाच्यासोबतचा अनुभव हा नेहमीच कमाल असतो. एक सुंदर कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करत आहोत, खात्री आहे प्रेक्षक त्याला इतर चित्रपटांप्रमाणेच आपलेसे करतील."

Hi Anokhi Gaath Trailer Released
Saadhi Manasa Promo Out: आकाश नलावडे आणि शिवानी बावकर पहिल्यांदाच एकत्र दिसणार, ‘साधी माणसं’ मालिकेचा प्रोमो रिलीज

श्रेयस तळपदे आपल्या 'ही अनोखी गाठ'च्या अनुभवाबद्दल बोलतो, "सध्याच्या काळात आपण सगळेच एका निर्मळ प्रेमकथेला मुकले आहोत. प्रेमकथेतील निरागसता हरवत चालली आहे आणि अशावेळी महेश दादांनी मला 'ही अनोखी गाठ'ची गोष्ट ऐकवली. त्या क्षणीच मी ठरवले हा चित्रपट करायचाच. मुळात महेश सर खूप निवडक सिनेमे करतात, त्यातही त्यांचे विषय वेगळे असतात. त्यामुळे या चित्रपटाचा मी भाग होतोय, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. महेश दादा आणि झी स्टुडिओजसोबत काम करण्याचा अनुभव मस्तच होता. मला खात्री आहे ही अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांनाही आवडेल."

Hi Anokhi Gaath Trailer Released
Aditya Narayan चा राग अनावर, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये चाहत्याला मारहाण करत मोबाईल फेकला; VIDEO व्हायरल

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com