Aditya Narayan चा राग अनावर, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये चाहत्याला मारहाण करत मोबाईल फेकला; VIDEO व्हायरल

Aditya Narayan Live Concert: आदित्य नारायणच्या नुकताच पार पडलेल्या लाइव्ह कॉन्सर्टमधील हा व्हिडीओ आहे. या कॉन्सर्टदरम्यान आदित्यने आपल्या चाहत्यासोबत गैरवर्तन केले. लाइव्ह कॉन्सर्टमध्ये आदित्यने आपल्या चाहत्याला मारहाण करत त्याचा मोबाईल फेकून दिला.
Aditya Narayan Angry On Fan
Aditya Narayan Angry On FanSaam Tv

Aditya Narayan Angry On Fan Viral Video:

बॉलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध गायक उदित नारायण (Udit Narayan) यांचा मुलगा आणि गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) बऱ्याचदा काहीना काही कारणास्तव चर्चेत असतो. आदित्य नारायणचा सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामुळे त्याला ट्रोल केले जात आहे. आदित्य नारायणच्या नुकताच पार पडलेल्या लाइव्ह कॉन्सर्टमधील हा व्हिडीओ आहे. या कॉन्सर्टदरम्यान आदित्यने आपल्या चाहत्यासोबत गैरवर्तन केले. लाइव्ह कॉन्सर्टमध्ये आदित्यने आपल्या चाहत्याला मारहाण करत त्याचा मोबाईल फेकून दिला. आदित्य नारायणचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटिझन्स त्याच्या या कृत्याचा निषेध करत आहेत.

आदित्य नारायणला त्याच्या रागावर अजिबात कंट्रोल होत नाही. तो त्याच्या शॉर्ट टेम्पर स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकताच आदित्यचे छत्तीसगडमधील भिलाई कॉलेजमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट झाले. या कॉन्सर्टमधला आदित्यचा एक संताप आणणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान तो त्याच्या चाहत्याला मारहाण करतो आणि त्याच्या हातामधला मोबाइल हिसकावून फेकून देतो. चाहत्यांसोबतची त्याची वागणूक पाहिल्यानंतर त्याच्यावर सर्वस्तरावरून टीका होत आहे.

भिलाई कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आदित्यच्या कॉन्सर्टला संगीतप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. या व्हायरल व्हिडिओमध्ये आदित्य शाहरुख खानच्या 'डॉन' चित्रपटातील ‘आज की रात’ हे गाणं गाताना दिसत आहे. या लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान आदित्यचा संयम सुटतो. आदित्य गाणं गात असताना त्याचा एक चाहता आपल्या मोबाइलमध्ये त्याचा व्हिडीओ कैद करत असतो. अशामध्ये अचानक आदित्यला राग येतो आणि तो चाहत्याच्या हातावर आधी माइकने मारतो. त्यानंतर चाहत्याच्या हातामधील मोबाइल हिसकावून घेत दूर फेकून देतो.

Aditya Narayan Angry On Fan
Rakul Preet Singh Wedding: रकुल प्रीत- जॅकीच्या घरी लगीनघाई, नवरदेवाचे घर लाइटिंगने सजलं; VIDEO व्हायरल

आदित्य कशामुळे नाराज झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण त्याने चाहत्याला ज्यापद्धतीने वागणूक दिली आहे त्यामुळे आता सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे. 36 वर्षीय आदित्यचे हे वाईट वर्तन पाहून तेथे उपस्थित प्रेक्षकही हैराण झाले. त्याच्या या कृतीवर सोशल मीडियावरही जोरदार टीका होत आहे. नेटिझन्सनी नाराजी व्यक्त केली आहे. एका यूजरने लिहिले की, 'आदित्य नारायणला काय प्रॉब्लेम आहे? एवढा अभिमान कशाला? आपल्याच चाहत्यांचा इतका अनादर? दुसऱ्या यूजरने लिहिले की 'तो कोण आहे असे त्याला वाटते?'

Aditya Narayan Angry On Fan
Shah Rukh Khan ने पहिल्या व्हॅलेंटाइन डेला Gauri Khan ला काय दिलं होतं गिफ्ट?, स्वत:च केला खुलासा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com