Saadhi Manasa Promo Out: आकाश नलावडे आणि शिवानी बावकर पहिल्यांदाच एकत्र दिसणार, ‘साधी माणसं’ मालिकेचा प्रोमो रिलीज

Saadhi Manasa Promo Released: स्टार प्रवाहवर अनेक मालिका नव्याने सुरू होणार आहेत. कायमच टीआरपी यादीमध्ये स्टारप्रवाह वरील अनेक मालिका अव्वल स्थानावर असतात.
Saadhi Manasa Promo Out
Saadhi Manasa Promo OutInstagram

Saadhi Manasa Promo Out

स्टार प्रवाहवर अनेक मालिका नव्याने सुरू होणार आहेत. कायमच टीआरपी यादीमध्ये स्टारप्रवाह वरील अनेक मालिका अव्वल स्थानावर असतात. अशातच स्टार प्रवाहवर आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये झी मराठीवरील ‘लागिर झालं जी’ मधली शितली आणि ‘सहकुटुंब सहपरिवार’मधला पश्या हे दोघेही मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या नव्या मालिकेच्या प्रोमोची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होताना दिसते. (Tv Serial)

Saadhi Manasa Promo Out
Aditya Narayanचा राग अनावर, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये चाहत्याला मारहाण करत मोबाईल फेकला; VIDEO व्हायरल

अवघ्या काही तासांपूर्वीच निर्मात्यांकडून मालिकेचा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो शेअर करताना, "हसण्यासाठी सांग आणि काय हवं, जगण्यासाठी सांग आणि काय हवं... नवी मालिका ‘साधी माणसं’ लवकरच स्टार प्रवाहावर..." अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे. या मालिकेचे कथानक सांगली शहरातलं आहे. मीरा आणि सत्या या दोन्हीही पात्रा भोवती फिरणारी लव्हस्टोरी प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे. (Star Pravah)

एकाच गावात राहायला असले तरी दोघेही विरोधी स्वभावाचे. मीरा स्वभावाने सकारात्मक, सहनशील आणि संपूर्ण कुटुंबाचा विचार करणारी. घरची परिस्थिती बेताची असली तरी हेही दिवस सरतील असा आत्मविश्वास बाळगणारी. तर सत्या आणि नशिबाचा ३६ चा आकडा आहे. डॉक्टर व्हायचं त्याचं स्वप्न होतं पण गॅरेजमध्ये मेकॅनिकचं काम करतो. स्वत:च्या धुंदीत रहाणारा. अश्या या विभिन्न स्वभावाच्या मीरा आणि सत्यामध्ये नियती नेमका कोणता खेळ करणार याची गोष्ट म्हणजे साधी माणसं ही मालिका. (Serial)

Saadhi Manasa Promo Out
Aai Kuthe Kai Karte: काय सांगता... 'आई कुठे काय करते' प्रेक्षकांचा निरोप घेणार?, या मालिकेच्या वेळेत येतेय रेश्मा शिंदेची नवी मालिका

अभिनेत्री शिवानी बावकर आणि आकाश नलावडे या मालिकेत मीरा आणि सत्याची भूमिका साकारणार आहेत. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती रणजीत ठाकूर आणि हेमंत रुपारेल यांच्या फ्रेम्स प्रोडक्शनची आहे. अजय कुरणे या मालिकेचं दिग्दर्शन करणार असून अनेक दिग्गज कलाकार मालिकेतून भेटीला येतील. प्रेक्षक ही मालिका पाहण्यासाठी फारच उत्सुक आहेत. (Entertainment News)

Saadhi Manasa Promo Out
Janhvi Kapoor चा भाव वाढला! आणखी एका साऊथ चित्रपटात मिळालं काम, मानधनातही केली वाढ

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com