Nagraj Manjule Film Audition: चित्रपटात काम करायचंय, तर नागराज मंजुळेंची इच्छुकांसाठी नवी संधी,पाहा कुठे ,कधी आणि कशी द्यायची ऑडिशन

Nagraj Manjule Film: नागराज मंजुळेनी अभिनयात काम करण्याची इच्छा असणाऱ्या नवख्या तरूणांना एक संधी दिली आहे.
Nagraj Manjule Film Audition
Nagraj Manjule Film AuditionInstagram @nagraj_manjule
Published On

Nagraj Manjule Film Audition News: मराठीतील उत्तम दिग्दर्शंकामध्ये नागराज मंजुळेंच नाव हे आपसुक येतच. नागराज मंजुळेनी आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. गावाखेड्यातील मातीला धरुन, सामाजिक समस्यांवर आधारित चित्रपट करण्यावर नागराज मंजुळेंचा सर्वाधिक भर असतो. आपल्या चित्रपटातील अनोख्या आणि हटकेपणामुळे नागराज मंजुळे प्रसिद्ध आहे. आता स्वतः नागराज मंजुळेनी अभिनयात काम करण्याची इच्छा असणाऱ्या नवख्या तरूणांसाठी एक संधी दिली आहे.

Nagraj Manjule Film Audition
Hardik Joshi-Akshaya Deodhar In Politics : राणादा - पाठक बाईंची नवी सुरूवात ; शिंदे गटात प्रवेश

नागराज मंजुळे हे त्यांच्या चित्रपटाच्या विषयामुळे नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकत असतात. त्यांच्या कामाची पद्धत म्हणजे ते नेहमीच नवीन चेहऱ्यांना चित्रपटात संधी देतात. मग ते ‘सैराट’ असो, ‘ख्वाडा’ किंवा ‘फॅंड्री’. सर्वच चित्रपटात त्यांनी नवीन चेहऱ्यांनी संधी दिली. त्यांचा सुपरहिट ठरलेला चित्रपट सैराट'मुळेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे नवीन कलाकार महाराष्ट्राला उमगले.

नागराज मंजुळे सध्या त्यांच्या आगामी चित्रपट ‘खाशाबा’वर काम करत आहे. त्यांचा हा चित्रपट दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. त्यांच्या या चित्रपटात नागराज मंजुळेनी नवीन चेहऱ्यांनी संधी देण्याची माहिती दिली आहे. इच्छुकांना ऑडिशन देण्याचे आवाहन केले आहे. या ऑडिशनसाठी मात्र काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. जर तुम्हालाही या चित्रपटात झळकायचे असेल तर या अटी पूर्ण करुन ऑडिशन द्या.

कुठे,कधी,कशी द्याल ऑडिशन

ऑडिशन देण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी नागराज मंजुळेनी एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये सर्व माहिती देण्यात आली आहे. ‘खाशाबा’ चित्रपटात फक्त मुलांसाठीच ऑडिशन ठेवण्यात आली आहे. मुलांसाठी वय वर्ष ०७ ते २५ पर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.

दिग्दर्शकांनी काही अटी देखील दिल्या आहेत, त्या अटी म्हणजे, मराठी भाषा तसंच माती आणि मॅटवरची कुस्ती येणं आवश्यक, पाच फोटो ( त्यातील 3 फोटो शरीरयष्टी दाखवणारे), ३० सेकंदाचा कुस्ती खेळताना व्हिडीओ, ३० सेकंदाचा स्वतःची थोडक्यात माहिती सांगणारा व्हिडीओ अशा अटी दिग्दर्शकांनी दिल्या आहे. फॉर्म भरण्याची अंतिम मुदत २० जुलै अशी पोस्ट नागराज मंजुळेंनी केली आहे.

Nagraj Manjule Film Audition
Nitin Gadkari In Khupte Tithe Gupte: ‘शरद पवार कधीच स्पष्ट बोलत नाहीत...’ नितीन गडकरींच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय?

नागराज मंजुळेनी अभिनेता होण्याची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक नवीन संधी उपलब्ध केली आहे.नागराज मंजुळेनी काही दिवसांपूर्वी 'खाशाबा' या चित्रपटाची घोषणा केली होती. कुस्तीत भारताच नावलौकिक करणाऱ्या खाशाबा जाधव याांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. पैलवान खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले ऑलम्पिक पदक मिळवून दिले आहे.या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन अशा दोन्ही जबाबदाऱ्या नागराज मंजुळे पेलवणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com