Khupte Tithe Gupte Latest Episode Teaser: अवधूत गुप्ते होस्ट करत असलेला ‘खुपते तिथे गुप्ते’ हा शो पहिल्या दिवसापासून टेलिव्हिजन क्षेत्रात पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. शो मध्ये आतापर्यंत अनेक राजकारण्यांनी प्रमुख पाहूणे म्हणून हजेरी लावलीय. येत्या रविवारच्या आगामी एपिसोडमध्ये भाजपा नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी हजेरी लावली आहे. अवधूतने आपल्या खास शैलीत नितिन गडकरींनी ही प्रश्न विचारत सर्व प्रश्नांची उत्तर मिळवली. नुकतंच ‘खुपते तिथे गुप्ते’चा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.
भाजपा नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमध्ये येत्या रविवारी हजेरी लावणार आहे. नुकताच ‘झी मराठी’च्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर आगामी एपिसोडचा टिझर शेअर करण्यात आला. व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये, अवधुत गुप्ते एक- एक करुन अनेक राजकीय नेत्यांचे फोटो नितीन गडकरींना दाखवतो. त्या विषयी तो त्यांना प्रश्न विचारत आहे.
अवधुतने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोटोंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा अनेक राजकीय नेत्यांचे फोटो दाखवले. या प्रत्येकाबद्दल खुपणारी एक गोष्ट नितीन गडकरींना सांगायची होती. त्यांना कोणत्या नेत्याची कोणती गोष्ट खुपते याचे उत्तर हवे असेल तर आपल्याला रविवार पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे.
प्रोमोमध्ये दिसतंय की, अवधुत गुप्तेने उद्धव ठाकरेंचा फोटो दाखवला.. तेव्हा गडकरी थोडंसं हसत म्हणाले.. ‘उद्धवसाहेब फोनवर फार कमी बोलतात.. मी प्रयत्न करायचो आधी जेव्हा पोहचायला वेळ लागायचा.. पण पोहचायचो मी..’ अशी मिश्किल टीप्पणी यावेळी नितीन गडकरींनी केली. तर पुढे नितीन गडकरींना शरद पवारांचा फोटो दाखवण्यात आला.
त्यावेळी नितीन गडकरींनी दिलेलं उत्तर सध्याच्या राजकीय परिस्थितीसोबत मिळते- जुळते आहे. प्रोमोमध्ये नितीन गडकरी म्हणतात, ‘पवार साहेब कधीच स्पष्ट बोलत नाही, ही गोष्ट मला खुपते.’
नितीन गडकरी आल्यानंतर कशाप्रकारे अवधुतच्या प्रश्नांना उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. ते येणार म्हटल्यावर सहाजिकच मजा येणारच. नितीन गडकरींचा हा भाग येत्या ९ जुलैला प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी या शोमध्ये राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत, उर्मिला मातोंडकर या राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.