Bigg Boss Season 4: बिग बॉस चावडीवर घेणार खेळाडूंची शाळा; आज कोण असणार निशाण्यावर?

आजच्या चावडीत महेश मांजरेकर कोणत्या मुद्द्यावरून खेळाडूंना घेरतात? सर्व खेळाडूंना काय कान मंत्र देणार हे ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
New Bigg Boss Logo
New Bigg Boss LogoSaam Tv

मुंबई: कलर्स मराठीवरील सर्वात जास्त टीआरपी असलेला रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस मराठी 4. (Bigg Boss) मराठी बिग बॉसच्या घरातील सदस्यांमध्ये शोच्या पहिल्या दिवसापासूनच चांगले भांडण रंगताना दिसले. त्यामुळे सर्वात जास्त यांच्यात युद्ध नुकतेच रंगताना दिसले. जेवढे भांडतात, तेवढेच ते सर्व खेळाडू धम्माल- मस्ती ही करतात. नुकत्याच खेळाडूंनी डान्सचाही आनंद लूटला. जो पर्यंत बिग बॉसच्या घरात दिलेले कार्य पूर्ण होत नाही, तो पर्यंत टीम ए आणि टीम बी मध्ये चांगलेच शीतयुद्ध रंगताना दिसले. (Marathi Entertainment News)

New Bigg Boss Logo
Gauri Sawant: तृथीयपंथी टाळी का वाजवतात? गौरी सावंतचा 'बस बाई बस'मध्ये कारण सांगितले...

गेल्या भागात बिग बॉसच्या घरात श्रेयस तळपदेने हजेरी लावली. त्याच्या 'आपडी थापडी' चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त बिग बॉसच्या घरात हजेरी लावली होती. सोबतच बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच अनेक रेकॉर्डब्रेक करत महिला कॅप्टनपदी विराजमान झाली. त्या स्पर्धकाचे नाव समृद्धी जाधव आहे. रविवारच्या भागात म्हणजेच आजच्या भागात चावडी आहे. त्यामुळे बिग बॉस काय बोलणार याची चांगलीच चर्चा रंगत आहे.

New Bigg Boss Logo
'Maja Ma' Movie Update: माधुरी दीक्षितच्या हिरोचा मोठा खुलासा: म्हणाला वाटलं नव्हतं असं होईल...

कालच्या झालेल्या चावडीत महेश मांजरेकरांनी सर्वात जास्त टिकेची झोड अपूर्वा नेमळेकर, प्रसाद जवादे यांच्यावर घेतली. तसेच बिग बॉसना वाटतंय कॅप्टन समृद्धी जाधवला तिचे स्वतःचे मत नाही! या मुद्द्यावरून मांजरेकरांनी काही प्रश्न उपस्थित करत कान टोचले. आजच्या चावडीत महेश मांजरेकर कोणत्या मुद्द्यावरून खेळाडूंना घेरतात?, सर्व खेळाडूंना काय कानमंत्र देणार हे ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आजच्या एपिसोडमध्ये सर्वच खेळाडूंना कोण हिरो आणि कोण झिरो असे हा खेळ करायचा आहे. कलर्स मराठीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आजच्या एपिसोडचा टीझर शेअर करण्यात आला आहे. त्या टीझरमध्ये, महेश मांजरेकर स्पर्धक निखिल राजशिर्केला खेळावरून ओरडले. निखिलच्या एका उत्तरामुळे महेश मांजरेकर त्याची कशी शाळा घेतात हे आजच्या भागातच कळेल.

Edit By: Chetan Bodke

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com