Gauri Sawant: तृथीयपंथी टाळी का वाजवतात? गौरी सावंतचा 'बस बाई बस'मध्ये कारण सांगितले...

कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंतने हजेरी लावली होती. यावेळी गौरीने काही खास बाबींवर भाष्य केले.
Gaiuri Sawant Upcoming Web Series
Gaiuri Sawant Upcoming Web SeriesSaam Tv

मुंबई: सुबोध भावे सुत्रसंचालकाच्या प्रमुख भूमिकेत (Subodh Bhave) असलेल्या 'बस बाई बस' कार्यक्रमात आपल्या खास शैलीत बऱ्याच अभिनेत्रींना (Marathi Actress) प्रश्न विचारून हैराण केले आहे. त्याची ही शैली बरीच प्रसिद्ध आहे. नेहमीच त्याच्या कार्यक्रमात वेगवेगळ्या महिलांना तो आमंत्रित करत असतो. आतापर्यंत कार्यक्रमाला राजकीय, मनोरंजन क्षेत्रातील बऱ्याच दिग्गज महिलांनी आपली प्रमुख उपस्थिती लावली आहे. त्या बऱ्याच महिलांनी विशिष्ट गौप्यस्फोट, आपल्या आयुष्यातील खास क्षण, किस्से आणि बऱ्याच गोष्टी सांगितल्या.

Gaiuri Sawant Upcoming Web Series
'Maja Ma' Movie Update: माधुरी दीक्षितच्या हिरोचा मोठा खुलासा: म्हणाला वाटलं नव्हतं असं होईल...

गेल्या आठवड्यात एका विशिष्ट व्यक्तीने झी मराठीवरील 'बस बाई बस' कार्यक्रमात आपली महत्वाची हजेरी लावली होती. कार्यक्रमात तृतीयपंथी लोकांसाठी झटणारी, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंतने (Gauri Sawant) हजेरी लावली होती. यावेळी गौरीने काही खास बाबींवर भाष्य केले. लवकरच गौरी सावंतच्या जीवनावर आधारित 'ताली' चित्रपट येणार आहे. (Bollywood) चित्रपटात तृतीयपंथीय गौरी सावंतच्या मुख्य भूमिकेत (Bollywood Actress) बॉलिवुड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) दिसणार आहे.

याचेच खास औचित्य साधत गौरी सावंत ही बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी गौरीने अभिनेता आणि सूत्रसंचालक सुबोध भावेच्या सर्वच प्रश्नांना सडेतोड उत्तर दिली. यावेळी अनेक गोष्टींचे खुलासे करताना एका महत्त्वाच्या गोष्टीचाही खुलासा केला. ती म्हणजे तृतीयपंथीय टाळ्या का वाजवतात? त्या मागील नेमकं रहस्य काय?

Gaiuri Sawant Upcoming Web Series
Taali First Look Out: सुष्मिताचा ट्रान्सजेंडरच्या भूमिकेतील फर्स्ट लूक, तुम्हीही पडाल प्रेमात

टाळीबद्दल गौरी सावंत सांगते, 'सिग्नलवर किंवा ट्रेनमध्ये जे तृतीयपंथीय टाळी वाजवतात ती टाळी सर्वसामान्य टाळ्यांप्रमाणे नसते.' टाळी वाजवण्यामागील सर्वांना त्याचा आक्रोश कळायला हवा. मी काय आहे हे सिद्ध करण्यासाठी ही टाळी आहे. असे ही गौरी बोलली. अजून किती काळ ही टाळी वाजवावी लागणार हा माझा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे, असा सवालही यावेळी उपस्थित केला. ज्यावेळी आरती बोलत असताना, कोणाचा सत्कार होत असताना वाजवल्या जाणाऱ्या टाळीपेक्षा ही टाळी खूप वेगळी आहे.

दरम्यान नुकतंच सुश्मिता सेनने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आगामी वेब सीरिज ‘ताली’चा लूक शेअर केला आहे. या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांच्या खांद्यावर असणार आहे. वेबसीरिज मधील अनेक गोष्टी अजूनही अनुत्तरीतच आहे.

Edit By: Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com