Asha Nadkarni Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Bollywood Actress Death: त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडसोबतच मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
Asha Nadkarni Passed Away
Asha Nadkarni Passed AwaySaam Tv
Published On

Asha Nadkarni Death: बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे निधन (Asha Nadkarni Passed Away) झाले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 50 ते 70 च्या दशकात आशा नाडकर्णी यांनी हिंदीसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडसोबतच मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आशा नाडकर्णी यांच्या पाश्चात मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे.

Asha Nadkarni Passed Away
BB OTT 2 Update: लिप लॉक पाहून प्रेक्षक भडकले ; बिग बॉस ओटीटी 2 संस्कारी असल्याचा दावा करणाऱ्या सलमानवर प्रश्नचिन्ह

मिळालेल्या माहितीनुसार, आशा नाडकर्णी यांचे मुंबईतील राहत्या घरी गुरुवारी रात्री निधन झाले. ते आपल्या कुटुंबीयांसोबत दक्षिण मुंबईमध्ये राहत होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. अखेर वृद्धापकाळ आणि आजाराने त्यांचे निधन झाले. आशा नाडकर्णी यांच्या मुलाने माध्यमांना त्यांच्या निधनाची बातमी दिली.

Asha Nadkarni Passed Away
Dharmendra Share Emotional Post : करण देओलच्या लग्नानंतर धर्मेंद्रनी हेमा-ईशाची मागितली माफी ; शेअर केली भावनिक पोस्ट

आशा नाडकर्णी यांनी वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्यांनी 50 ते 70 च्या दशकात बॉलिवूड अभिनेते सुनील दत्त, किशोर कुमार, अभिनेत्री आशा पारेख, शर्मिला टागोर यासारख्या प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले होते. मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील दमदार अभिनयाच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते.

आशा नाडकर्णी यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्या मूळच्या पुण्याच्या होत्या. त्या 1957 मध्ये आपल्या कुटुंबासह मुंबईत स्थायिक झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी चित्रपटामध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतून आपल्या अभिनयाला सुरुवात केली. त्या उत्तम नर्तिका देखील होत्या. त्यांनी फक्त हिंदीच नाही तर मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले होते.

Asha Nadkarni Passed Away
Prashant Damle And Kavita Lad In KHC: ‘कोण होणार करोडपती’मध्ये प्रशांत दामले, हॉटसीटवरून शेअर केली ‘मोरूची मावशी’ची सक्सेस स्टोरी

प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी त्यांना आपल्या चित्रपटात काम करण्याची पहिली संधी दिली. ‘मौसी’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यांनी 'नवरंग' (1959), 'गुरु और चेला' (1973), 'चिराग' (1969), 'फरिश्ता' (1968), 'श्रीमानजी' (1968), 'दिल और मोहब्बत' (1968), 'अलबेला मस्ताना' (1967), 'बेगुनाह' (1970) या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. त्याचसोबत त्यांनी ‘श्रीमान बाळासाहेब’, 'वंदना', ‘क्षण आला भाग्याचा’, ‘मानला तर देव’ सारख्या मराठी चित्रपटांत देखील काम केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com