Saie Tamhankar: आज मुकाट्यानं घरी बसा, मुसळधार पावसामुळे सई ताम्हणकरचे चाहत्यांना आवाहन

Saie Tamhankar Insta Post: मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने देखील आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर पोस्ट करत दम देत घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे.
Saie Tamhankar: आज मुकाट्यानं घरी बसा, मुसळधार पावसामुळे सई ताम्हणकरचे चाहत्यांना आवाहन
Saie TamhankarSaam Tv

मुंबईमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rainfall In Mumbai) पडत आहे. या पावसामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले. यामुळे रस्ते वाहतुकीसह रेल्वे सेवा देखील ठप्प झाली होती. आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुंबईकरांची अक्षरश: दैना झाली. सरकारकडून नागरिकांना घरी थांबण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. अशामध्ये मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने देखील आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर पोस्ट करत दम देत घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे.

Saie Tamhankar: आज मुकाट्यानं घरी बसा, मुसळधार पावसामुळे सई ताम्हणकरचे चाहत्यांना आवाहन
Kalki 2898 AD ची ११ व्या दिवशी छप्परफाड कमाई, दुसऱ्या आठवड्यातच 'गदर २'चा मोडला रेकॉर्ड

अभिनेत्री सई ताम्हणकरने चाहत्यांना घरी बसण्याचे आवाहन केले आहे. आजच्या पावसाने मुंबईला झोपडून काढले म्हणून सईने तिच्या चाहत्यांना हा सल्ला दिला आहे. सईने आज आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर पाऊस पडतानाचा फोटो शेअर करत त्यावर 'आज मुकाट्यानं घरी बसा' असं लिहिले. या पोस्टद्वारे सईने मुंबईकरांना घरात बसण्याचे आवाहन केले आहे. टेक केअर मुंबई असं म्हणत तिने सगळ्यांना काळजी देखील घेण्याचा सल्ला दिला.

Saie Tamhankar: आज मुकाट्यानं घरी बसा, मुसळधार पावसामुळे सई ताम्हणकरचे चाहत्यांना आवाहन
Siddharth Jadhav : कर्तव्य तत्पर मुंबई पोलिसांचे सिद्धार्थ जाधवने मानले आभार; नेटकऱ्यांकडून सिद्धूवर कौतुकाचा वर्षाव

दरम्यान, मुंबईत सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. सकाळपासून झालेल्या पावसामुळे भांडूप, विद्याविहार, कुर्ला आणि सायन रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे लोकलसेवा ठप्प झाली होती. काही तासांनंतर लोकसेवा पूर्ववत झाली पण अजूनही लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे लोकलला प्रचंड गर्दी आहे. अशामध्ये प्रत्येक रेल्वे स्थानकांवर देखील प्रवाशांची गर्दी वाढली आहे. सकाळी लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांना ऑफिसला पोहचण्यास उशिर झाला. आता घरी जाताना देखील लोकल उशिराने धावत असल्यामुळे मुंबईकरांना घरी जाताना देखील त्रास सहन करावा लागत आहे. उशामध्ये मुंबईकरांना घरीच सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

Saie Tamhankar: आज मुकाट्यानं घरी बसा, मुसळधार पावसामुळे सई ताम्हणकरचे चाहत्यांना आवाहन
Mumbai VIDEO: थोड्याच वेळात मुंबईमध्ये हाय टाईड, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com