Radha Sagar Shared Video: ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने दिली चाहत्यांना गुड न्यूज, अभिनेत्रीचा बेबी बंप व्हिडीओ व्हायरल...

Marathi Actress Flaunt Her Baby Bump: अनेक खलनायकी भूमिका असो किंवा विनोदी भूमिका साकारणारी राधा सागर आता लवकरच आई होणार आहे.
Radha Sagar Baby Bump Video
Radha Sagar Baby Bump VideoSaam Tv
Published On: 

Radha Sagar Baby Bump Video: गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजनसृष्टीत कार्यरत असलेली राधा सागर सध्या सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आली आहे. तिने आतापर्यंत 'आई कुठे काय करते', 'सुंदरा मनामध्ये भरली' अशा हिट मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली. सोबतच चंद्रमुखी चित्रपटातून देखील तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

अनेक खलनायकी भूमिका असो किंवा विनोदी भूमिका साकारणारी राधा सागर आता लवकरच आई होणार आहे. राधाने नुकताच एक गोड व्हिडिओ शेयर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. राधाचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

Radha Sagar Baby Bump Video
Nawazuddin Siddiqui On Multiplex Ticket: नवाजुद्दिनचं मल्टिप्लेक्समधील तिकीट दरावर महत्वाचं भाष्य, थेट सरकारलाच दिला कानमंत्र

आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय घडतंय याची माहिती जाणून घेण्याची सर्वच चाहत्यांना उत्सुकता असते. त्यांच्या सुख: दुखात, महत्वाच्या कार्यक्रमात सामील होण्याची चाहत्यांना फारच हौस असते. सेलिब्रिटी सोशल मीडियावर नेहमीच महत्वाच्या अपडेट शेअर करतात. त्यावर चाहते नेहमीच लक्ष ठेवून असतात. अशी एक गुड न्यूज अभिनेत्री राधा सागरने दिली आहे.

Radha Sagar Baby Bump Video
Shreya Bugde Share Post: प्रेक्षकांचे आभार मानत श्रेया बुगडेने शेअर केली पोस्ट, म्हणाली माझं कौतुक करायला आल्या अन्...

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राधा सागर म्हणते, “माझ्यासाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे.....” असं ती यावेळी म्हणाली आहे. कारण आज राधाचा वाढदिवस असून तिने गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. (Serial)

काही दिवसांपूर्वीच शूटिंगमधून राधा सागरने ब्रेक घेतला. त्यावेळी तिनं चाहत्यांसोबत नेमकं कारण काय आहे, हे सांगितलं नव्हतं. पण अखेर त्यांचं आता कारण उघड झालं आहे. राधाने एक सुंदर व्हिडीओ शेअर करत ती गरोदर असल्याची बातमी दिली आहे. राधा आणि तिचा पती सागर कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर बेबी बंप दाखवत फोटोशूट केले आहे. या क्यूट व्हिडीओवर प्रेक्षकांनी कमेंटचा वर्षाव करत लाईक्सचा पाऊस पाडला आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.