Prema Sakhardande: ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे निधन; अक्षय कुमारच्या 'या' चित्रपटात साकारली महत्वाची भूमिका

Marathi Actress Prema Sakhardande: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे त्यांच्या माहीम इथल्या राहत्या घरी गुरुवारी रात्री निधन झाले आहे.
Marathi Actress Prema Sakhardande
Marathi Actress Prema SakhardandeSaam Tv
Published On

Marathi Actress Prema Sakhardande : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे त्यांच्या माहीम इथल्या राहत्या घरी गुरुवारी रात्री १०च्या सुमारास वृद्धापकाळानं निधन झाले आहे. प्रेमा साखरदांडे यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांची कन्या आहे. रात्री दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत प्रेमा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या अनेक दशकांपासून सिनेसृष्टीत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांचे वडील वसंतराव कामेरकर हे हिज मास्टर्स व्हॉइस या ध्वनिमुद्रिका बनविणाऱ्या कंपनीत ध्वनिमुद्रक म्ह्णून कार्यरत होते. प्रेमा साखरदांडे यांना दहा भावंडे होती. त्यांच्या भगिनी ज्योत्स्ना कार्येकर, सुलभा देशपांडे आणि आशा दंडवते या देखील अभिनय क्षेत्रात होत्या. बंधू बापू, अशोक, विश्वनाथ, मुकुंद यांनीही रंगभूमी, चित्रपट, आणि दूरचित्रवाणीच्या माध्यमात काम केले आहे. म्हणजेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने आपल्या कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Marathi Actress Prema Sakhardande
David Warner Movie: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरची इंडियन सिनेमात एन्ट्री; 'या' चित्रपटातून साकारणार महत्त्वाची भूमिका

प्रपंच मालिकेतील भूमिका

काही वर्षांपूर्वी टीव्हीवर गाजलेल्या प्रपंच मालिकेतही प्रेमा यांनी साकारलेली आजीची भूमिका प्रेक्षकांना खास आवडली. आजही मालिका, सिनेमा, चित्रपटातील आजीचा चेहरा म्हणून सर्वप्रथम त्यांचाच चेहरा डोळ्यासमोर येतो.

Marathi Actress Prema Sakhardande
Sardesai Wada Memorial: संगमेश्वरच्या सरदेसाई वाड्याचे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकात रूपांतर; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

फनरल सिनेमातील भूमिका गाजली

तसेच काही वर्षांपूर्वी आलेल्या फनरल या सिनेमात प्रेमा यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. हा चित्रपट अंतिम संस्कार व्यवस्थापना'चे काम या विषयावर आधारित होता. त्याचबरोबर प्रेमा यांनी बॉलिवूडच्या स्पेशल २६, इम्पॉसिबल मर्डर या चित्रपटांतही महत्वाची भूमिका साकारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com