David Warner Movie: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरची इंडियन सिनेमात एन्ट्री; 'या' चित्रपटातून साकारणार महत्त्वाची भूमिका

David Warner Indian Movie: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर भारताला आपले दुसरे घर मानतो, लवकरच तो भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. हे खुद्द चित्रपटाच्या निर्मात्यानेच उघड केले आहे.
David Warner Movie
David Warner MovieSaam Tv
Published On

David Warner Movie: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर भारताला आपले दुसरे घर मानतो, हे त्याने अनेकदा सांगितले आहे. तो बॉलिवूड आणि टॉलिवूडचा खूप मोठा चाहता आहे, तो अनेकदा सोशल मीडियावर हिंदी किंवा तमिळ गाण्यांचे रील्स शेअर करतो. आता त्याच्याबद्दल एक बातमी आली आहे, लवकरच तो टॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हे खुद्द चित्रपटाच्या निर्मात्यानेच उघड केले आहे.

डेव्हिड वॉर्नर वेंकी कुडुमुला दिग्दर्शित 'रॉबिन हूड' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. या अ‍ॅक्शनने भरलेल्या मनोरंजक चित्रपटात वॉर्नर एका छोट्या भूमिकेत दिसणार आहे, त्यामुळे त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक वाय रविशंकर यांनी स्वतः याची पुष्टी केली आहे. दुसऱ्या चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान त्याने या बातमीची पुष्टी केली. डेव्हिड वॉर्नरला टॉलीवूडमध्ये लाँच केल्याबद्दल निर्मात्याने आनंद व्यक्त केला आणि म्हणाला, "आमच्या 'रॉबिन हूड' द्वारे भारतीय चित्रपटसृष्टीत डेव्हिड वॉर्नरला लाँच करताना आम्हाला खूप आनंद होत आहे." अधिकृत घोषणा होण्यापूर्वी ही बातमी उघड केल्याबद्दल निर्मात्याने दिग्दर्शक वेंकी कुडुमुला यांची माफीही मागितली.

David Warner Movie
Sardesai Wada Memorial: संगमेश्वरच्या सरदेसाई वाड्याचे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकात रूपांतर; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

प्रसिद्ध अभिनेते नितीन यांच्या चित्रपटात डेव्हिड वॉर्नर

प्रसिद्ध तेलुगू अभिनेता नितीन 'रॉबिन हुड' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नितीन या चित्रपटात हनी सिंग नावाच्या चोराची भूमिका साकारतो, जो गरिबांना मदत करण्यासाठी श्रीमंतांना लुटतो. चित्रपटाची कथा हनीभोवती फिरते.

David Warner Movie
Sourav Ganguly Biopic: राजकुमार राव साकारणार माजी क्रिकेटर सौरव गांगुलीची भूमिका; क्रिकेटरनेच सांगितलं सत्य

'रॉबिन हुड' हा चित्रपट गेल्या वर्षी पुढे ढकलण्यात आला होता. हा चित्रपट यावर्षी २८ मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरमुळे या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. नवीन येरनेनी आणि वाय रविशंकर निर्मित या चित्रपटात श्रीलीला मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका आहे. रॉबिन हूडचे संगीत राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीत दिग्दर्शक जी.व्ही. प्रकाश कुमार यांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com