Prajakta Mali: फुलवंतीचा महाराणीसारखा थाट! करारी नजर, गळ्यात गहू माळ; प्राजक्ता माळीचे फोटो पाहून प्रेमात पडाल

Prajakta Mali Maharani Look: प्राजक्ता माळीने सोनेरी ऑरेग्जा साडीत पारंपारिक दागिन्यांसह शाही लूक साकारला आहे. जयपूरच्या गायत्रीदेवींच्या शैलीतील हा लूक प्राजक्तराजच्या ऐतिहासिक दागिन्यांनी अधिक खुलला आहे.
Entertainment News
Prajakta MaliSaam Tv
Published On

अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हटलं की सौंदर्याची खाण असं म्हणायला हरकत नाही. भारतीय संस्कृती असो की पाश्चिमात्य कोणत्याही सौंदर्यामध्ये प्राजक्ता माळी कायमच आकर्षक दिसते. प्राजक्ता माळीला फोटोशूटची प्रचंड आवड आहे. ती कायमच तिचे फोटो क्लिक करत असते. आता देखील प्राजक्ताने काही खास अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Entertainment News
Prajakta Gaikwad: 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचं लग्न 'ठरलं', 'ते' फोटो पाहताच नेटकऱ्यांनी विचारलं, होणारा नवरा कोण?

अभिनेत्री प्राजक्ताने सोनेरी रंगाच्या ऑरेग्जा साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. या लूकसाठी प्राजक्ताने पारंपारिक असे दागिने परिधान केले आहे. डोक्यावर पदर असा प्राजक्ताचा लूक चाहत्यांच्या पसंतीस आला आहे. जयपूरच्या महाराणी गायत्रादेवी यांना समर्पित असल्याचं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. पुढे तिने, 'प्राजक्तराज- पारंपरिक मराठी साज… मोती संच… ह्यानिमित्ताने माझी आवडती गहू माळ संचात आलीए.. जी मी “फुलवंती” चित्रपटात परिधान केली होती.' असं कॅप्शन दिलं आहे. या जबरदस्त लूकसाठी प्राजक्ताने दागिने परिधान केले आहेत. तिने मोतीगहूमाळ, मौक्तिकमाळा असा साजश्रृंगार करत लूक पूर्ण केला आहे.

सोशल मीडियावर प्राजक्ताचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्री प्राजक्ताविषयीच्या अपडेट घेण्यासाठी चाहते देखील प्रचंड उत्सुक असात. नुकताच शेअर केलेल्या प्राजक्ताच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांकडून भन्नाट कमेंट्स येत आहेत. नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याचं भरभरून कोतुक केलं आहे.

प्राजक्ता माळीचा दागिन्याचा ब्रँड

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा अभिनेत्रीसोबत बिझनेसवूमन देखील आहे. 'प्राजक्तराज' च्या दागिना ब्रँडच्या माध्यमातून इतिहासकालीन दागिने प्राजक्ताने प्रेक्षकांसमोर आणले आहेत. वर्षानुवर्षे चालत आलेले पारंपारिक दागिने पुन्हा एकदा प्राजक्तराजच्या स्वरूपात आले आहेत. प्राजक्तराज ब्रँडमध्ये बुगडी, शिंदेशाही तोडे, पैलू पाटली, मासोळ्या, बेलपान, बकुळीहार, पुतळीहार, साज, ठुशी, नथ, मोहनमाळ, चंद्रहार हे दागिने आहेत. या दागिन्यांची नावे तुळजा, म्हाळसा आणि सोनसळा अशी दागिन्यांच्या शृंखलेची नावं आहेत

Entertainment News
Nora Fatehi-Shreya Ghoshal : मेलोडी क्वीन श्रेया घोषाल अन् दिलबर गर्ल नोरा फतेही एकत्र, क्रॉस-कल्चरल व्होकल कोलॅबोरेशनची चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com