
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी पूजा सावंत एक आहे. पूजा सावंतने गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रेमाची कबुली दिली. सोबतच अभिनेत्रीने तिची बॉयफ्रेंड सिद्धेशसोबत ओळख कशी झाली, याबद्दलही सांगितले.
गेल्या काही दिवसांपूर्वीच ती तिच्या मित्र मैत्रिणींसोबत गोव्याला न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी गेली होती. त्यावेळी तिच्या मित्र मैत्रिणींनी तिचं 'ब्राईड टू बी'ही केलं. नुकतंच तिने सोशल मीडियावर एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे. या रोमँटिक व्हिडीओमध्ये सिद्धेश तिला गुडघ्यावर बसून लग्नाची मागणी घालताना दिसतोय. त्याने केलेल्या हटक्या प्रपोजमुळे अभिनेत्री भारावून गेली आहे. (Marathi Actress)
पूजाने नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. अभिनेत्रीने शेअर केलेल्या ह्या रोमँटिक व्हिडीओने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. आपल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर अभिनेत्रीला लग्नासाठी मागणी घालताना दिसत आहे.
शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने सिद्धेश तिला मांडीवर बसून लग्नासाठी मागणी घालताना दिसत आहे. तिला लग्नाबद्दल विचारल्यानंतर दोघांच्याही मित्र मैत्रिणींनी एकच कल्ला आणि जल्लोष केलेला दिसत आहे. यावेळी व्हिडीओमध्ये सिद्धेश तिला अंगठी घालताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री भारावून गेलेली दिसते. (Social Media)
हा रोमँटिक व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने सुंदर कॅप्शन दिलेलं आहे. अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, "आतापर्यंत परिकथेतले स्वप्न कधीही पाहिले नव्हते. 'a perfect guy' हे वाक्य फक्त मला काल्पनिक वाटायचे. पण मी तुला (सिद्धेश) भेटली. माझ्या परिकथेतील ‘मिस्टर परफेक्ट’ मला सापडला. या व्हिडीओमध्ये माझी २०२३ मधील काही आठवणी नाहीत. तर, १.२० मिनिटांमध्ये मी माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. २०२४ चं एकत्रित स्वागत करण्यासाठी सज्ज होऊया… मनामध्ये थोडसं दडपण आहे पण मला माहितीये तू नेहमीच माझ्यासोबत आहेस. I love you Mr. Chavan, Thank you universe, Thank you 2023" (Marathi Film)
२८ नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत पूजाने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर तिने त्याचं नाव सांगत त्याची चाहत्यांसोबत ओळखही करुन दिली. पूजाने प्रेमाची कबुली दिल्यापासून सोशल मीडियावर तिच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. सिद्धेश असं त्याचं नाव असून तो मुळचा मुंबईकर आहे. तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियामध्ये असतो. तो फायनन्ससंबंधित काम करतो. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.