Neha Pendse : नेहा पेंडसेच्या कातिल अदा पाहून चाहते फिदा, पाहा 'कान्स'मधील PHOTOS

Cannes Film Festival 2025 : 'कान्स फिल्म फेस्टीव्हल 2025'मध्ये मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेच्या लूकनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या खास डेब्यूचं सुंदर फोटो पाहा.
Cannes Film Festival 2025
Neha PendseSAAM TV
Published On

मराठी सोबत हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री नेहा पेंडसेच्या (Neha Pendse) 'कान्स' लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या कमालीच्या फॅशन आणि ग्लॅमरस फोटोंमुळे ती कायम चर्चेत असते. मराठीबरोबर नेहाने हिंदी कलाविश्व देखील गाजवलं आहे. 'मे आय कम इन मॅडम?' या मालिकेमुळे नेहा पेंडसेला चांगलीच लोकप्रियता मिळाली. पुढे नेहा पेंडसे 'भाभीजी घर पर है' मालिकेत अनिता भाभीच्या भूमिकेत पाहायला मिळाली. त्यानंतर नेहा पेंडसे 'जून' या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर नेहाने अनेक दमदार प्रोजेक्टमध्ये काम केले आहे.

नेहा पेंडसेच्या 'कान्स' डेब्यूनंतर सोशल मीडियावर तिच्या लूकची चर्चा पाहायला मिळत आहे. नेहा पेंडसेने 'कान्स फिल्म फेस्टीव्हल 2025'ला (Cannes Film Festival 2025) हजेरी लावली आणि आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केले आहे. तिच्या रेड कार्पेट लूक पाहून चाहते फिदा झाले आहेत. नेहाचा हा पहिला 'कान्स' लूक असून ती खूपच छान दिसत आहे. नेहा पेंडसेने 'कान्स'साठी काळ्या रंगाचा वेस्टन गाऊन ड्रेस परिधान केला होता. केसांचा बन आणि सिल्व्हर ज्वेलरीने तिने हा लूक पूर्ण केला आहे. तिने आपल्या या लूकचे फोटो इन्स्टाग्राम शेअर केले आहेत.

नेहाने इन्स्टाग्राम शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती समुद्रकिनारी पोझ देताना दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केले आहे. नेहा पेंडसे कान्सचा अनुभव शेअर करत म्हणाली की, "प्रत्येक कलाकारांसाठी कान्समध्ये जाणं हे एक स्वप्न असत आणि माझ्यासाठी सुद्धा हा क्षण स्वप्नपूर्ती सारख आहे. मला माझा लूक हा थोडा खास ठेवायचा होता पण सोबतीने तो कसा उठावदार आणि वेगळा दिसू शकतो याचा देखील मी विचार केला आणि मनीष घरत ने हे सत्यात उतरवण्यासाठी माझी मदत केली आणि हा लूक उत्तम बनवला आहे."

पुढे नेहा म्हणाली, "'कान्स'साठीचा लूक हा मला शार्प आणि तितकाच ताकदीचा असावं असं वाटतं होत. कान्स डेब्यू करताना थोडी मनात धाकधूक तर होती पण टेन्शन न घेता इथल्या गोष्टी छान एन्जॉय करायचा हेच ठरवून मी इकडे आली आहे." नेहाने आजवर तिच्या फॅशनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि कान्स मधल्या या तिच्या लूकचं देखील तितकंच तोंडभरून कौतुक प्रेक्षक करताना दिसत आहेत.

Cannes Film Festival 2025
Sanjay Narvekar : कॉमेडीचा तडका! संजय नार्वेकरांच्या 'म्हणजे वाघाचे पंजे' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com