Tu Tevha Tashi Marathi Serial: ‘शेवट कधीच सोपा नसतो...’ तू तेव्हा तशी संपल्यावर स्वप्निल जोशीला अश्रु अनावर

Swapnil Joshi on Tu Tevha Tashi End: स्वप्निल झी मराठीवरील ‘तु तेव्हा तशी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. अखेर या मालिकेने आपल्या प्रेक्षकांचा निरोप घेतला.
Tu Teva Jashi Fame Swapnil Joshi
Tu Teva Jashi Fame Swapnil JoshiInstagram
Published On: 

Tu Teva Tashi Fame Swapnil Joshi: मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेला स्वप्निल जोशी सध्या मालिकेमुळे बराच चर्चेत आहे. स्वप्निलने आपल्या अभिनयाची जादू फक्त मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही दाखवली. स्वप्निलने मराठी सिनेसृष्टीत चित्रपट, मालिका आणि वेबसीरिजच्या माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

स्वप्निल झी मराठीवरील ‘तु तेव्हा तशी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. अखेर या मालिकेने आपल्या प्रेक्षकांचा निरोप घेतला. काल मालिकेच्या शेवटच्या दिवशी स्वप्निलने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

Tu Teva Jashi Fame Swapnil Joshi
Mrs Undercover: राधिकाचा कधीही न पाहिलेला अंदाज, टीझर पाहून “फॅमिली मॅन”च आठवला

त्याने या मालिकेत समीर पटवर्धन नावाचे पात्र साकारले आहे. त्याची भूमिका चांगलीच गाजली आहे. अनामिका आणि सौरभची जोडी टेलिव्हिजनसृष्टीत एक हिट जोडी म्हणून नावारुपाला आली आहे. पण काल या मालिकेने लाडक्या प्रेक्षकांचा अखेरचा निरोप घेतला. मालिकेचा काल अखेरचा दिवस असल्याने मालिकेतील कलाकार बरेच इमोशनल होताना दिसले. अशातच स्वप्नीलने देखील अशाच आशयाची पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

त्याच्या पोस्टमध्ये स्वप्निल म्हणतो, ‘शेवट कधीच सोपा नसतो! आज रात्री ‘तु तेव्हा तशी’ संपत आहे. या मालिकेतील शेवटचा शॉट माझ्या कारकिर्दीतील सर्वात कठीण शॉट्सपैकी एक होता. ते तांत्रिकदृष्ट्या कठीण होते म्हणून नाही, तर संपूर्ण युनिट तिथे उभं राहून आम्हाला पाहत होतं. सगळ्यांच्या डोळ्यात त्यावेळी आनंदाश्रू होते. इथे तयार झालेले बंध आणि हे आनंदाश्रू! आमचे संपूर्ण युनिट आणि आमचं झीचं कुटुंब. यावेळी सर्वांचे डोळे पाणावले होते.’

तर पुढे तो म्हणतो, ‘आम्ही आमच्या कामाला कौटुंबिक कार्यक्रम म्हणतो! आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. कारण आम्ही एकत्र राहतो. आम्ही एकत्र हसतो. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. आता मालिका संपणार असल्याने आम्ही रोज भेटणार नसलो तरी आम्ही नेहमीच या कुटुंबाचा एक भाग असू!’अशी भावनिक पोस्ट यावेळी त्याने शेअर केली आहे.’

Tu Teva Jashi Fame Swapnil Joshi
Best Actress Hruta Durgule: स्वप्न सत्यात उतरले; सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेल्या हृताने मानले फॅन्सचे आभार

स्वप्निलची ही पोस्ट पाहून चाहते, इतर कलाकार मंडळी आणि मालिकेतील कलाकार देखील भावूक झाले आहेत. स्वप्निलने केलेल्या पोस्टवर काही चाहत्यांनी कमेंट केली आहे, चाहते कमेंट करत म्हणतात, ‘मिस यू पट्या, फक्त मालिकेलाच नाही तर तुलाही मिस करु.’ तर आणखी एक जण म्हणतो, ‘आम्ही या मालिकेला फारच मिस करु’ अशा भावनिक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.

मालिकेत पट्या आणि अनुची अनोखी लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. घटस्फोट घेत वेगळी झालेल्या एका मुलीची स्वतःच्या पायावर उभी असलेली आई अनामिक अनु आणि आपल्या कुटुंबावर प्रेम करणारा पट्या या दोघांची अनोखी प्रेम कहाणी मालिकेत होती. अनोखी लव्हस्टोरी दाखवणाऱ्या या मालिकेने प्रेक्षकांचा अखेरचा निरोप घेतला. या मालिकेत प्रमुख भूमिकेत स्वप्नील जोशी, शिल्पा तुळसकर, सुहास जोशी, स्वानंद केतकर, अभिज्ञा भावे आणि रुमानी खरे हे कलाकार होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.