Sankarshan Karhade : "ज्या हातांनी १०० शतकं केली तो हातात..."; सचिन तेंडुलकरच्या भेटीनंतर संकर्षण कऱ्हाडेने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Sankarshan Karhade-Sachin Tendulkar Meet : अभिनेता, होस्ट आणि कवी संकर्षण कऱ्हाडे आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांची भेट झाली. त्यांच्या भेटीची सुंदर झलक संकर्षणने सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
Sankarshan Karhade-Sachin Tendulkar Meet
Sankarshan KarhadeSAAM TV
Published On

होस्टिंग आणि कवितांनी लाखो लोकांच्या मनात घर करणारा मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे कायमच त्याच्या कामामुळे चर्चेत राहीला आहे. संकर्षण कऱ्हाडेने (Sankarshan Karhade) आजवर अनेक नाटक, मालिका, चित्रपट यांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तो आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. संकर्षण कऱ्हाडे हा खूप अभ्यासू आणि त्याला साहित्याची खूप आवड आहे.

अभिनेता आणि अनेकांचा लाडका कवी संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. त्याच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरसोबत (Sachin Tendulkar ) एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोला संकर्षणने एक हटके कॅप्शन दिलं आहे. जे वाचून कोणाच्याही डोळ्यांत पाणी येईल. संकर्षणने इन्स्टाग्रामवर सचिन तेंडुलकरसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत.

संकर्षण कऱ्हाडे पोस्ट

काय बोलायचं …??? फक्तं अनुभवायचं …आज पुण्यात "चितळे परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं निवेदन करायची संधी मिळाली. पाहुणा कोण होता …??? साक्षात "क्रिकेटचा देव" भारतरत्नं सचिन तेंडुलकर… ५ मिनिटं शांतपणे बोलता आलं…ज्या हातांनी १०० शतकं केली तो हातात घेता आला. जे पाय हजारो रन्स काढायला धावले त्यांना स्पर्श करता आला …"भारतरत्न" असलेल्या "सचिन" सोबत २ तास मंचावरती ऊभं राहाता आलं …ज्याच्याकडे अपेक्षेने सगळा हिंदुस्थान बघायचा त्याने त्याची नजर माझ्यावर फिरवली… माझ्या शब्दांत माझ्या भावना ज्या अनेकांच्या मनांत आहेत त्या सांगता आल्या अजून काय पाहिजे …???

आकाशातल्या देवा आभार... तू जमिनीवरचा देव दावला

सचिन तेंडुलकर

संकर्षण कऱ्हाडेच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि कलाकरांकडून प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. संकर्षण कऱ्हाडेची नुकतीच सचिन तेंडुलकर यांच्यासोबत भेट झाल्यामुळे तो भारावून गेला आहे.

Sankarshan Karhade-Sachin Tendulkar Meet
Arjun Kapoor : 'मेरे हसबंड की बीवी' चित्रपटाच्या प्रमोशनला अर्जुनला लग्नाचा प्रश्न, उत्तर देताना म्हणाला...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com